शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागझीरा-नवेगावबांध येथे ‘हाय अलर्ट’

By admin | Updated: July 25, 2016 00:36 IST

भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या उमरेड कऱ्हांडला राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास असलेल्या व जुने माहेरघर असलेल्या ..

प्रकरण ‘जय’ची शोधमोहीम : वन कर्मचाऱ्यांची दमछाकसंजय साठवणे साकोलीभंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या उमरेड कऱ्हांडला राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास असलेल्या व जुने माहेरघर असलेल्या नागझीरा अभयारण्यातील जय नामक वाघाच्या शोधार्थ नागझीरा व नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात आठ दिवस हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी डोळ्यात तेल घालुन जय चा शोध घेत आहेत. नागझीरा अभयारण्यात जन्माला आलेल्या जय हा वाघ काही वर्षापुर्वी उमरेड कऱ्हांडला या राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पात निघुन गेला. लहानपणापासुनच पर्यटकांना आवडणारा देखना वाघ हा सर्वाच्याच आवडीचा होता. पुर्वी नागझीरा अभयारण्यात व नंतर उमरेड कऱ्हांडला व्याघ्रप्रकल्पात सर्वांना हवाहवासा वाटणारा हा जय वाघ मागील काही महिन्यापासून बेपत्ता आहे. जय बेपत्ता झाल्यापासून वनविभागाचे अधिकारी त्याला शोधण्यासाठी तारेवरची कसरत करीत आहेत. मात्र जय चा अजुनपर्यंत थांगपत्ता लागला नाही. ऐवढेच नाही तर जय च्या गळ्यातील रेडीओ कॉलरही निष्क्रीय झाल्याचे वनविभागाची चिंता वाढली आहे.भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील जंगले एकमेकांना लागुन असल्याने जयचा शोध घेणे अडचणीचे झाले आहे. मात्र जयचे माहेरघर हे नागझीरा अभयारण्य असल्याने तो नागझीरा अभयारण्यात तर आला नसावा अशी शंका बळावली.त्यामुळे इकडेही जयची शोधाशोध सुरु झाली आहे. यासाठी नागझीरा नवेगाव हा व्याघ्रप्रकल्प दोन दिवसांपासून हाय अलर्ट करण्यात आले असुन नवीन नागझीरा, जुना नागझीरा, नवेगावबांध, कोका जंगल परिसर पुर्णपणे पिंजून काढण्यात येत आहे. मात्र अजुनपर्यंत जय चा शोध लागला नाही. जय च्यामाहेरघर हे नागझीरा अश्रयास्थ असल्यामुळे कदाचित जय हा नागझीरा अभयारण्यात आला तर नाही यासाठी नागझीरा व नवेगावबांध येथे हाय अलर्ट करण्यात आला. जयच्या शोधात शोधमोहिम जोरात सुरु आहे.- नरेश खंडाते,सहाय्यक वनसंरक्षक