शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी नोंदणीसाठी तहसीलमध्ये मदत कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:30 IST

महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत भंडारा जिल्हयातील सर्वच तालुक्यातील पात्र शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यासाठी ......

ठळक मुद्देअर्ज भरण्यासाठी १७५ केंद्र कार्यान्वित : नि:शुल्क अर्ज भरण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत भंडारा जिल्हयातील सर्वच तालुक्यातील पात्र शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असून या कालावधीत शेतकºयांना सर्व्हर तसेच इतर तांत्रिक अडचणी आल्यास त्यासाठी सर्व उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयात उद्यापासून मदत कक्ष उघडण्यात येणार आहेत. आॅनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड नसले तरी नोंदणी होणार असून शेतकºयांनी १५ सप्टेंबर पर्यंत आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे. अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यामध्ये भंडारा जिल्हयाचे काम आतापर्यंत ९५ टक्के झाले आहे.आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.बी. तरकसे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., शिल्पा सोनाले, अर्चना मोरे, अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर, जिल्हा बँक महाव्यवस्थापक संजय बरडे व सर्व तहसिलदार उपस्थित होते.आॅनलाईन अर्ज नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस उरले असून या दोन दिवसात पात्र प्रत्येक शेतकºयाची नोंदणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आज झालेल्या बैठकीत यंत्रणेला दिले. यासाठी तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात येत असून ज्या शेतक?्यांना नोंदणीसाठी अडचणी निर्माण होतात. त्यांनी मदत कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांना आॅनलाईन नोंदणीमध्ये अडचणी निर्माण होतील अशा शेतक?्यांनी आपली माहिती मदत कक्षात नोंदवावी. आधार कार्ड नसले तरी नोंदणी करता येणार असून नोंदणी झाल्यावर आधारकार्ड काढून आधार नंबर देण्याची सुविधा शासनाने दिली आहे. सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार आणि सहाय्यक निबंधक यांनी एकही शेतकरी नोंदणीतून सुटता कामा नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.देशातील सर्वात मोठा असा ३४ कोटीचा कर्जमाफीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून कुठलीही अट न ठेवता सरसकट अशी कर्ज माफीची योजना असून त्यामध्ये शेतकºयांची दिड लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील ३६ लाखांपेक्षा अधिक शेतकºयांचा सातबारा कोरा होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा भंडारा जिल्हयातील अंदाजे ९५ हजार शेतकºयांना लाभ मिळणार आहे.सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँक मिळून जिल्हयातील एक लाख १७ हजार ९९४ खातेदारांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे. त्यापैकी कर्ज घेणारे सभासद आणि नियमित कर्ज भरणारे सभासद मिळून अंदाजे ९५ हजार शेतकºयांना कृषी सन्मान कर्ज माफी योजनेचा लाभ मिळणार आहे. यात ७१ हजार ६०७ शेतकरी नियमित कर्ज भरणा करणारे आहेत. जिल्हयात एक लाख १७ हजार ९९४ शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समाविष्ट होतील. यापैकी काही शेतकरी अपात्र ठरु शकतात. त्यामुळे सरासरी 95 हजार शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतीने आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यासाठी जिल्हयात १७५ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये आपले सरकार महाआॅनलाईन व सी.एस.सी. केंद्रांचा समावेश आहे. भंडारा-३१, तुमसर-२७, मोहाडी-२१, पवनी-२५, लाखनी-२३, साकोली-२७ व लाखांदूर-२१ केंद्राचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर शेतकºयांकडून कुठलेही मुल्य न आकारता अर्ज भरुन देण्याची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त काही खाजगी केंद्रांकडून शेतकरी आपला अर्ज आॅनलाईन अपलोड करु शकतात.प्रशासनाच्या वतीने सर्व राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँक, तहसिल, पंचायत समिती व शासकीय कार्यालयात अजार्चे नमुने उपलब्ध करुन दिले आहेत. अर्ज आॅनलाईन भरण्याच्या केंद्रावर अर्ज भरुन देण्याची सुविधा असली तरी शेतकºयांची वैयक्तिक माहिती त्यांनी स्वत: भरावयाची आहे. यासाठी गटसचिव त्यांना सहकार्य करणार आहेत. या सोबतच ३६८ कृषि सहकारी सोसायटयामध्ये केंद्र निश्चित केले आहे. या ठिकाणी सुध्दा अर्ज भरण्यात येणार आहे.