शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीचा तिढा सोडविण्यासाठी लगतच्या राज्यांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:57 IST

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. ...

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. गेल्या खरीप हंगामात या दाेन्ही विभागाकडून ५० लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आले; पण अद्यापही या धानाची राइस मिलर्सने भरडाईसाठी उचल न केल्याने धान केंद्रावर तसेच पडून आहे. त्यामुळे या धानाची उचल करून गोदामात साठवून ठेवण्यासाठी लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात गोदामांचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.

गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामासह रबी हंगामातसुद्धा धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात ३५ हजार हेक्टरवर रबी धानाची लागवड करण्यात आली होती. येत्या दहा-पंधरा दिवसांत रबीतील धान कापणीला सुरुवात होणार असून, मळणी करून ते बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापही शासकीय धान खरेदी सुरू झाली नसून खरेदी केव्हा सुरू होईल हेसुद्धा अद्याप निश्चित झाले नाही.

खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानापैकी ३३ लाख क्विंटल धान अजूनही भरडाईसाठी उचल न झाल्याने ते गोदामातच पडले आहे. त्यामुळे गोदामे हाउसफुल असून, रबीत खरेदी केलेले धान ठेवायचे कुठे, अशी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेतसुद्धा भर पडली असून, रबीतील धान खरेदी कधी सुरू होते याकडे शेतकरी चातकासारखे लक्ष लावून आहेत.

त्यामुळे शासनानेसुद्धा हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात धान साठवून ठेवण्यासाठी गोदामे उपलब्ध होतात का, याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यावर काय तोडगा निघतो याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.