शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 21:53 IST

धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांना मदतीची मागणी रेटून धरल्याने अखेर शासनाने बोनस आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहिर केले.

ठळक मुद्देचरण वाघमारे : अधिवेशनात तुमसर मतदार संघातील अनेक प्रश्न निकाली

आॅनलाईन लोकमतभंडारा : धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांना मदतीची मागणी रेटून धरल्याने अखेर शासनाने बोनस आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहिर केले. शासनाच्या निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. हिवाळी अधिवेशनात तुमसर मतदार संघातील अनेक प्रश्न निकाली काढण्यात यश आल्याचे तुमसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चरण वाघमारे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.अधिवेशन संपल्यानंतर तुमसर विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीने झालेल्या कामाची माहिती देण्याकरिता आ. चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ३० जुलैपर्यंत रोवणी न झालेल्या शेतकºयाला मदत देण्याच्या विषयाला घेवून सभागृह तहकुब करण्यात आले. त्याअनुषंगाने राज्याच्या कृषी मंत्र्यांनी धान उत्पादक भागातील आमदाराचे बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नुकसानीपोटी मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे आ. चरण वाघमारे हे म्हणाले.जिरा येथील शेतीसाठी हेक्टरी सात हजार ९७० तर बागायती शेतीसाठी १५ हजार ६७० रूपये मदत दिली जाणार असल्याचे सांगत दोन हेक्टरची मर्यादा आखून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आजपर्यंत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देताना जिरायती शेतीचे निकष लावले जात होते. मात्र येथील शेतकऱ्यांच्या सात-बारावर सिंचनाचा उल्लेख असल्याने व बºयाच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्याने त्याला बागायती मदत दिली जावी, असे सांगून कृषी मंत्री त्याबद्दल सकारात्मक जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांना बागायतीच्या धर्तीवर मदत मिळेल, असा विश्वास यावेळी वाघमारे यांनी व्यक्त केला.३० जुलैपर्यंत रोवणी न झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ मिळणार असून यासाठी जिल्ह्यातील ११ राजस्व विभाग पात्र ठरले आहेत. साकोतील एक वगळता उर्वरित १० राजस्व विभाग हे तुमसर मतदार संघातील असल्याचे ते म्हणाले. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्यांना १०० टक्के विमा मिळणार असून खाजगी संस्थांकडून कर्ज घेणाऱ्या संस्थांनाही मदतीचा लाभ मिळणार असल्याचे सांगत हेक्टरी ९,८०० रूपयांची मदत अशा लोकांनाही दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने २०० रूपये बोनस देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याने त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार २९५ शेतकऱ्यांना ८१ कोटी २० लाख रूपयांचा कर्ज माफिचा लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. तुमसर मतदार संघातील अनेक विषय अधिवेशनात मार्गी लागले असून येत्या ७ जानेवारी रोजी माहोडी येथे रोजगार मेळावा असल्याची माहिती दिली.