शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आशावर्कर व अंगणवाडी सेविकांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

गरजू नागरिकांसह कोरोनाच्या लढाईत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यक मदत करणाºयांसाठी मदतीचे हात समोर येत आहेत. वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या संदर्भात घरोघरी फिरून आवश्यक माहिती गोळा करणाºया आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : वरठी येथे पाण्याच्या उच्च दर्जाच्या बाटल्या वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : कोरोनाच्या लढाईत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीचे ओघ सुरूच आहे. गरजू नागरिकांसह कोरोनाच्या लढाईत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यक मदत करणाऱ्यांसाठी मदतीचे हात समोर येत आहेत. वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या संदर्भात घरोघरी फिरून आवश्यक माहिती गोळा करणाºया आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या.उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा तापत्या उन्हात घरोघरी जाऊन कोरोना संशयीत रुग्ण व नागरिकांची आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यावर आहे. माहितीकरिता गावात फिरताना धास्तीने कुणी घरातही प्रवेश देत नाहीत.उन्हाचा पारा वाढल्याने त्यांना पाण्याची गरज भासते. पण परिस्थितीमुळे त्यांना काम अवघड होत आहे.उन्हाच्या तडाख्यात काम करणाऱ्यांची नेमकी अडचण लक्षात घेऊन वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या बाटल्याचे वाटप केले. सदर बाटल्या थर्मास प्रकारच्या असून थंड पाणी थंड व गरम वस्तू गरम ठेवणाऱ्या आहेत. त्यामुळे आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना मोलाची मदत मिळाली आहे.वरठी येथील ११ आशावर्कर व १० अंगणवाडी सेविकांना सदर बाटल्या वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच मनोज सुखाणी, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम बोन्द्रे, संदीप बोन्द्रे, गणेश पिंगळे, सचिन माहुले, संगीता सुखाणी, सुजाता भाजीपाला, श्रीरंग बोन्द्रे, महादेव मते उपस्थित होते. वाटप करताना सामाजिक अंतराचे भान ठेवण्यात आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या