साकोली : शुक्रवारला रात्री विजेच्या कडकडासह संततधार पाऊस बरसला. या पावसामुळे साकोली तालुक्यातील जमनापूर, विर्शी, लवारी व पळसगाव मार्ग पुलावर पाणी आल्याने मार्ग बंद झाले. निम्न चुलबंद प्रकल्पाचे सातही दरवाजे उघडण्यात आले असून चुलबंद नदी दुथडी भरून वाहत आहे. साकोली तालुक्यात १२५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून एकोडी सर्कलमध्ये १०६ मि.मी. व सानगडी सर्कलमध्ये १४५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. चार मार्ग बंदअतिवृष्टीमुळे साकोली येथील नवनजीवन कॉन्व्हेंट परिसरातील घराशेजारी पाणी शिरले असून जमनापूर मार्ग, विर्शी पुलावर पाणी आल्यामुळे विर्शी मार्ग, लवारी मार्ग व पळसगाव हे चारही मार्ग बंद आहेत.घरात शिरले पाणीनगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पंचशील वॉर्डातील कुंभरे यांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्यांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले. लहरीबाबा मठाच्या बाजुच्या वॉर्डातही पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. माजी ग्रामपंचायत सदस्य शारदा वाडीभस्मे, माजी उपसरपंच किशोर पोगळे, महादेव कापगते यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना बोलावून पाणी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.वीज पडून म्हैस ठाररात्री वीज पडल्याने प्रदीप बोरकर रा.सेंदूरवाफा यांच्या अंगणात वीज पडल्याने ४० हजार रुपये किमतीची त्यांची म्हैस जागीच ठार झाली.तीन लाखांचे नुकसानसाकोली तालुक्यात एकूण ७४ घरे व गोठे पडले. यात साकोली सर्कल अंतर्गत ३२ घरे व गोठे, सानगडी सर्कलमध्ये २७ घरे अंशत:, ३ मोठे अंशत: व १ घर पूर्णत: पडल्याची नोंद करण्यात आली असून जवळपास तीन लाखाचे नुकसान झाले आहे.नाल्या सफाई केल्या नाहीपंचशील वॉर्ड व एमआयडीसी एरिया या भागात ग्रामपंचायत अंतर्गत नालीचे नवीन बांधकाम मंजूर झाले होते. मात्र त्यावेळी नगरपंचायत घोषित झाले. मात्र नगरपंचायतच्या प्रशासनातर्फे या नाल्या तयार करण्यात आल्या नाही तर नाल्याही साफ करण्यात आल्या नाही. परिणामी लोकांच्या घरात पाणी शिरले, असा आरोप साकोलीचे माजी उपसरपंच किशोर पोगळे यांनी केला आहे.(तालुका प्रतिनिधी)
साकोली तालुक्यात अतिवृष्टी
By admin | Updated: August 30, 2015 00:21 IST