शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचारी वसाहत वाळवीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:00 IST

आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता ...

ठळक मुद्देगावपासूनचे अंतर पाहता एकही कर्मचारी राहावयास तयार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता एकही कर्मचारी राहावयास तयार नाही. परिणामी ही इमारत धूळखात पडली असून वाळवीच्या भक्षस्थानी पडू लागली आहे.इमारतीच्या बांधकामावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्चही पाण्यात गेला असून शासनाच्या तिजोरीवर अकारण भुर्दंड पडला आहे. भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागुन असलेल्या लाखांदूर या तालुकास्थळी पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. कालांतराने या रुग्णालयाचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात येऊन दर्जाही वाढविण्यात आला होता. लाखांदूर पासून काही अंतरावर तीन ते चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आरोग्य विभागातील कार्यरत कर्मचाºयांच्या निवासाची गंभीर समस्या लक्षात घेऊन ही बहुमजली इमारत शासनाने तयार करून दिली. मात्र तिथे एकही कर्मचारी राहत नसल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्यामुळे येथील सर्व महागड्या साहित्यांची चोरी झाली आहे. येथील कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असून काही बाहेरगाववरून येणे जाणे करतात.ही इमारत अंतरगावच्या हद्दीत असून लाखांदूरपासून ३ किमी अंतरावर आहे. इमारत गावाबाहेर असल्याने कर्मचारी या इमारतीत वास्तव्य करण्यास तयार नाही. या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून, दारे व खिडक्या चोरांनी लांबविल्या आहेत.आजघडीला गरिबांच्या घरांचा प्रश्न आहे आणि इकडे कोट्यवधी रुपयांची इमारत जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी प्रशासनाने एखाद्या गरीब कुटुंबाला आश्रय दिला तर वावगे ठरणार नाही मात्र शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे १६ वर्षांपुर्वी तयार झालेल्या इमारतीला भग्नावस्था आली असून असामाजिक तत्व आणि मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनलेल्या इमारतीच्या उभारणीवर खर्च झालेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याचे दिसून येते. या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन या इमारतीत गरिबांना तरी आश्रय देऊ करावे व इमारतीत जे कर्मचारी राहव्यास तयार नाही त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जनता करू लागली आहे .