पवनी : अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन अर्थात अधिवेशन बुलढाणा येथील सहकार सांस्कृतिक भवन चिखली रोड येथे आयोजित करण्यात आलेले आहे.संमेलनाचे उद्घाटन दि. २९ आॅक्टोबरला दुपारी ३ वाजता होणार असून समारोप दि. ३१ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता अतिथी व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. शैक्षणिक संमेलनात राज्याचे शैक्षणिक धोरण, शाळेमधील प्रशासकीय कामकाज, मुख्याध्यापकांचे दैनंदिन कार्यात उद्भवणाऱ्या समस्या, मुख्याध्यापकांचे वेतन श्रेणीचा प्रश्न या विषयावर चर्चा करून ठराव घेण्यात येणार आहेत. तसेच शैक्षणिक विषयावरील तिन्ही विभागांचे निबंध वाचन करून त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विश्वविख्यात लोणार सरोवर व अन्य धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन अध्यापनात त्याचा उपयोग करण्याची संधी लाभणार आहे. शैक्षणिक संमेलनास उपस्थित राहून संघाचे अस्तित्व सिद्ध करावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, अध्यक्ष मारोती खेडेकर, सचिव नंदकुमार बारवकर, विदर्भ विभागाचे सचिव अशोक पारधी यांनी केले आहे.(तालुका प्रतिनिधी)
मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन
By admin | Updated: October 27, 2014 22:32 IST