शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुख्याध्यापकाला भाजपाने नाकारला प्रवेश

By admin | Updated: January 20, 2015 00:01 IST

खाजगी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असूनही सतत राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या आणि व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या त्या मुख्याध्यापकाला भाजपाने पक्षात प्रवेश नाकारला आहे़

भंडारा : खाजगी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असूनही सतत राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या आणि व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या त्या मुख्याध्यापकाला भाजपाने पक्षात प्रवेश नाकारला आहे़ भाजपा पदाधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवून अखेर हताश झालेल्या या मुख्याध्यापकाची आता वरीष्ठ पातळीवर लॉबिंग सुरू आहे़ राज्यात १५ वर्ष आघाडीचे शासन असताना लागेबांधे तसेच साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून सदर मुख्याध्यापकाने शिक्षण मंडळ सदस्यपदी स्वत:ची वर्णी लावून घेतली होती़ तथापि, केंद्र संचालक व अतिरीक्त केंद्र संचालकाच्या नियुक्तीसाठी वसुली करणे, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार चालू देणे, राजकीय पुढाऱ्यांसोबत राहून शाळा संचालकांवर दबाव टाकणे असे अनेक गैरप्रकार उघडकीस आले होते़ यासंदर्भात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीही झाल्या होत्या़ पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा दावा करणाऱ्या या मुख्याध्यापकाने काही महिन्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मागितली होती. यासाठी दिल्ली व मुंबईपर्यंत येरझारा घातल्या होत्या. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठीने त्याच्या विनंतीअर्जाला केराची टोपली दाखविली़ दरम्यान, काही महिन्यापूर्वी शिक्षण मंडळ सदस्यपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मुख्याध्यापकाने पुन्हा या पदावर आपली नियुक्ती करवून घेण्यात यश मिळविले़ काही मंत्री व काँग्रेस नेत्यांच्या फोटोसह बॅनरही लावले होते़ परंतु, थेट राज्यपालापर्यंत तक्रारी झाल्यानंतर शिक्षण मंडळ सदस्यपद वांध्यात आले आणि लागलेले बॅनर काढून घ्यावे लागले़ विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपा- शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले़ शिक्षण मंडळ सदस्य हे पद गेल्यामुळे कासाविस झालेल्या या मुख्याध्यापकाने दोन महिन्यापासून भाजपात प्रवेशासाठी लॉबिंग चालविली होती़ भाजपा संघटनेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे त्याने धाव घेतली़ मात्र, पक्षात प्रवेश दिल्यास फायदा कमी आणि नुकसान अधिक होणार असल्याचे हेरून या मुख्याध्यापकाला भाजपात प्रवेश नाकारण्यात आला आहे.स्थानिक पातळीवर डाळ शिजत नसल्याचे पाहून त्याने नागपूर जिल्ह्यातील एका आमदारामार्फत पक्षप्रवेशाची शिफारसही केली. इतकेच नव्हे तर, शिक्षण मंडळ सदस्यपदी पुन्हा वर्णी लावावी म्हणून विनंतीही केली आहे़ मात्र, भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षात घेण्यासाठी ठाम विरोध दर्शविल्यामुळे पक्षप्रवेशचे दार बंद झाले आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)