शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या पंधरा वर्षांपासून 'तो' करतोय राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 13:38 IST

Bhandara News भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्?यात गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देण्याचे व्रत एका देशभक्ताने निष्ठेने जोपासले आहे.

दयाल भोवतेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्?यात गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देण्याचे व्रत एका देशभक्ताने निष्ठेने जोपासले आहे. भोजराज फागो कडीखाये रा. लाखांदूर असे त्याचे नाव असून त्याचा इस्त्रीचा व्यवसाय आहे.कपडे धुवून त्यांना इस्त्री करून ग्राहकांना देणे हे त्यांचे वडिलोपार्जित काम. त्यांच्या आजोबांच्या काळापासून कपड्यांना इस्त्री करून दिली जात आहे. त्यांचे लाखांदूर येथे मानव लॉन्ड्री नावाने कपड्यांना इस्त्री करण्याचे दुकान आहे. वर्षभर या दुकानांमधून स्थानिक लाखांदूर येथील नागरिकांचे कपडे धुवून व प्रेस करून दिले जातात.स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन या तीन राष्ट्रीय सणांच्या दिवशी तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात, निमशासकीय कार्यालयात व शाळा महाविद्यालयात राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो. तो दिवस निघून गेला की संध्याकाळच्या दरम्यान शासकीय नियमात राष्ट्रध्वजाला उतरवले जाते. त्यानंतरच्या दुस?्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्याच राष्ट्रध्वजाचा पुन्हा वापर केला जातो. मात्र सुरुवातीला वापर केल्यानंतर राष्ट्रध्वजाला घड्या पडल्या असल्याने त्याला इस्त्री करणे आवश्यक असते. सध्याच्या घडीला सर्वत्रच पैसे घेऊन इस्त्री करून देऊन आर्थिक व्यवहार केले जात आहेत मात्र अशाच राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देऊन एक नवीनच देशसेवा येथील तरुण करत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.इथे देताहेत सेवागत काही वषार्पासून लाखांदूर येथील पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, शिवाजी विद्यालय, नगरपंचायत कार्यालय, मडेघाट येथील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात आथली, सेवा सहकारी संस्था कार्यालय लाखांदूर, ग्रामपंचायत कार्यालय असोला, शिवाजी प्राथमिक शाळा लाखांदूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखांदूर येथून दरवर्षीच राष्ट्रध्वज धुवून इस्त्री करण्यासाठी येत असल्याची माहिती भोजराज कडीखाये यांनी दिली आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन