शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल्या घरी सुखी राहा’, बोलून घेतला जगाचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:11 IST

लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्यानंतर मुलीला दिल्या घरी सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन निरोप दिला आणि त्यानंतर मांडववाढणीच्या दिवशी वधूपित्याने जगाचा निरोप घेतल्याची हृदयदायक घटना रविवारला विरली बु. येथे घडली.

ठळक मुद्देविरली येथील घटना : मांडव वाढणीच्या दिवशी वधूपित्याचा मृत्यू, आनंदमय वातावरणावर काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्यानंतर मुलीला दिल्या घरी सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन निरोप दिला आणि त्यानंतर मांडववाढणीच्या दिवशी वधूपित्याने जगाचा निरोप घेतल्याची हृदयदायक घटना रविवारला विरली बु. येथे घडली. या घटनेमुळे लग्नसोहळ्याच्या आनंदावर काळाने विरजन घातले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेतील मृताचे नाव पुरूषोत्तम भिकाजी बन्सोड (४८) रा. विरली बु असे आहे. बन्सोड यांच्या प्राजक्ता नामक मुलीचे चकारा येथील कुणाल खोब्रागडे यांच्याशी शुक्रवारला शुभमंगल पार पडले. विवाहसोहळ्यानंतर बन्सोड यांनी मुलीला, ‘बेटा दिल्या घरी सुखी राहा’, असे बोलून तिला निरोप दिला होता.वराकडील स्वागत समारंभ सोहळा आटोपल्यानंतर रविवारला मांडव वाढणीसाठी नवदाम्पत्य विरली बु. येथे आले होते. वधूमंडपी लग्नसमारंभाच्या या समारोपीय कार्यक्रमाची लगबग सुरू असतानाच दुपारी वधूपित्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांच्यावर वाटेतच काळाने झडप घातली. त्यांचा मृत्यूमुळे वधूच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आनंददायी लग्नसोहळ्याचे वातावरण अचानक दु:खात परावर्तित झाले.कुणीही अशी कल्पनाही केली नसावी असा हा प्रसंग विरली वासीयांच्या स्मरणात कायम कोरला गेला.स्थानिक स्मशानभूमीत रविवारला सायंकाळी उशीरा बन्सोड यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नववधू प्राजक्ताचे अश्रू अनावर झाले होते. ‘बाबा सोडून गेले,’ हेच एकमेव वाक्य तिच्या मुखी होते. बन्सोड यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.