लोकमत युवा नेक्स्टचा कार्यक्रम : कर्नल जे.एस. रावत यांचे प्रतिपादन भंडारा : नॅशनल डिफेन्स अॅकेडमी (एन.डी.ए.) करिता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड व्हावी याकरिता राज्य शासनाने औरंगाबाद येथे सर्व्हीसेस प्रिपे्रटरी इन्स्टिट्युटची स्थापना केली आहे. औरंगाबाद येथील एसपीआय संस्थेत विद्यार्थ्यांना दहावीनंतर प्रवेश दिला जातो. एनडीएची तयारी कशी करायची? यासाठी औरंगाबाद येथील एसपीआय संस्थेत प्रशिक्षण घेता येते. या संस्थेच्या माध्यमातून संरक्षण सेवेत अधिकारी बनण्याचे स्वप्न साकारून देशाची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळेल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त कर्नल जे.एस. रावत यांनी केले. लोकमत युवा नेक्स्ट व डिफेन्स सर्व्हीसेस अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन एनडीए या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर म्हणाले, एनडीएमध्ये प्रवेश, अभ्यासक्रम, केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शिक्षण, नोकरी व उच्च अधिकारी बनण्याकरिता वैयक्तिक क्षमता याबद्दल माहिती दिली. सोबतच बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी बारावीनंतर नॅशनल डिफेन्स अॅकेडमी खडकवासला पुणेमार्फत संरक्षण सेवेत उच्च अधिकारी पदावर जाण्याची संधी आहे. एनडीएमध्ये निवड झाल्यास पदवीचे बी.ई., बी.टेक, बी.एस्सीचे नि:शुल्क शिक्षण भारत सरकार करते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये सबलेफ्टनंट, कॅप्टन अशा पदावर निवड होऊन लाखो रूपयांची नोकरी मिळू शकते. एनडीएबद्दल मार्गदर्शन देणारी विदर्भातील एकमेव संस्था म्हणून डिफेन्स सर्वीसेस अॅकेडमी विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेत अधिकारी बनण्यासाठी सहकार्य करेल, असे सांगितले. यावेळी मंचावर प्रा.सुनिल महांकाळ, मेजर अंकुश कटरे, ट्रेनिंग आॅफीसर युवराज टेंभरे व प्रा.वंदना लुटे, युवा नेक्स्टचे संयोजक ललित घाटबांधे उपस्थित होते. यावेळी डिफेन्स सर्व्हीसेस अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)
संरक्षण सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगा
By admin | Updated: February 26, 2016 00:49 IST