शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कापणीयोग्य धानपीक पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:54 IST

शेतकºयांनी कशी बशी रोवणी आटोपल्यानंतर ऐनवेळी वरूनराजाने दडी मारली. त्यामुळे कित्येक शेतकºयांचे उभे पिक वाळु लागेल होते.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शेतकºयांनी कशी बशी रोवणी आटोपल्यानंतर ऐनवेळी वरूनराजाने दडी मारली. त्यामुळे कित्येक शेतकºयांचे उभे पिक वाळु लागेल होते. वीजपुरवठा नियमित राहत नसल्याने अनेक शेतकरी बांधवांनी इजिन पंपाच्या साहाय्याने धान पिकाला वाढविले. आणि लष्करी अळी पडली, उसनवार घेऊन किंवा व्याजाने औषधे घेऊन फवारणी केली. परंतु आता तो मेटाकुटीला आला आहे.लष्कर अळी, भारनियमन, डोक्यावर असणारा कजार्चा डोंगर, सततची नापिकी यासारख्या अनेक समस्यांनी शेतकरी माय-बाप हवालदिल झालेला असताना. शेतातील उभे पिक वाळु लागल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. भूगभार्तील पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतकरी यांच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत. अनेक प्रकारच्या उपाययोजना आखून धान पिक जोमात आले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने हजेरी लावली असून, कापनीसाठी आलेल्या धानाला या पावसाचा फटका बसला आहे. लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकºयाच्या शेतातील कापनीसाठी आलेले उभे पिक जास्त पाण्यामुळे कुजले, तर काही ठिकाणी धानाच्या लोबाना अंकूर फुटले आहे. त्यामुळे हातात आलेले पिक, हातातून निसटून जाण्याच्या मार्गावर आहेत.जिल्ह्यातील ४० टक्के शेतकरी यांचे पिक कापणीला आली आहेत. मात्र तिन दिवसापासुन लागून पडलेल्या पावसामुळे धानाची कापनी करू शकत नाही. लाखांदूर तालुक्यातील मोहरणा परिसरातील टेभरी, खैरी/पट, विहीरगाव, गवराळा, खैरणा, दोनाड, डांभेविरली, सावरगाव, मादेड, कुडेगाव, रोहणी, किरमटी या गावातील अनेक शेतकºयाची धान पिके पाण्यामुळे कुजण्याच्या स्थितीत आहेत.कडपाला सडका वासपालांदूर : मागील तीन दिवसापासून पालांदूर परिसरात परतीच्या पावसाची हजेरी कायम असल्याने धानपिकाला सुमार नुकसान पोहचत आहे. कापलेल्या धानाच्या कडपांना सडका वास सुटला असून भुईसपाट धानसुद्धा सडण्याच्या मार्गावर असून साचलेले पाणी बांधणातून काढण्याचा प्रयत्न शेतकरी जीव ओतून करीत आहे. ही वास्तविकता हजारो हेक्टरात पालांदूर परिसरात अनुभवायला मिळत आहे.हातातोंडाशी आलेले धानपिक निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले असून शेतकरी पुरता हतबल झाला आहे. निसर्ग शेतकºयांच्या पाचविलाच पुजला असल्याने जगावे का मरावे अशी अवस्था झाली आहे. डोक्यावर कर्जाचे ओझे असह्य होत आहे.पिकविमा मिळणार का?अचानकपणे निसर्गाने अवकृपा करीत सुसाटवाºयासह जोरदार पाऊस झाला. यात पालांदूर परिसरातील हजारो हेक्टरमधील धानपिकाची नुकसान शक्य आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.