लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सासुरवाडीला गेलेल्या किराणा व्यवसायीकाचे घर फोडून चोरट्यांनी १४ तोळे सोने आणि ३० तोळे चांदी असा चार लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना येथील सुभाष वॉर्डात घडली.मोहाडी येथील सुभाष वॉर्डात गणपत काशीराम रायकवाड (३८) यांचे घर आहे. किराणा व्यवसायीक असलेले गणपत रविवारी अड्याळ येथे आपल्या सासुरवाडीला गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील कानातील वेल सहा ग्रॅम, अकरा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, २३ ग्रॅम वजनाचे नेकलेस, १९ ग्रॅमचा लक्ष्मी हार, २० ग्रामचा गोफ, ३० ग्राम वजनाचे मोठे मंगळसुत्र, १७ ग्राम वजनाचे लहान मंगळसुत्र, तीन ग्राम वजनाच्या कानातील बिऱ्या, दीड ग्राम वजनाचे नाणे असे १४ तोळे सोने आणि ३० तोळे चांदीचे दागिने लंपास केले.हा प्रकार शेजारी राहणाºया व्यक्तीच्या लक्षात आला. रायकवाड सहपरिवार बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरातील लाईट सुरु दिसले. तसेच एक व्यक्ती समोरील गेटवरून उडी मारून पळताना दिसला. त्यामुळे त्यांनी तात्काळ गणपत रायकवाड यांना मोबाईलवरून सूचना दिली. रायकवाड तेवढ््या रात्रीच आपल्या कारने घरी आले. त्यावेळेस घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच कपडे पलंगावर फेकलेले होते.या घटनेची माहिती रात्रीच मोहाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही हाती लागले नाही. अधिक तपास ठाणेदार निलेश वाजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बंडू थेरे, जगन्नाथ गिºहेपुंजे करीत आहेत.
किराणा व्यवसायिकाकडे साडेचार लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:28 IST
सासुरवाडीला गेलेल्या किराणा व्यवसायीकाचे घर फोडून चोरट्यांनी १४ तोळे सोने आणि ३० तोळे चांदी असा चार लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना येथील सुभाष वॉर्डात घडली.
किराणा व्यवसायिकाकडे साडेचार लाखांची चोरी
ठळक मुद्देमोहाडीची घटना : सोन्याचांदीचे दागिने लंपास