शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरातील हनुमान तलाव ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:01 IST

मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. शहरातील विनोबा भावे नगर जलमय झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. जवळील हनुमान तलाव तुडूंब भरला असून तलाव फूटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. तलावाशेजारीच नागरिकांची येथे घरे आहेत.

ठळक मुद्देधोक्याची शक्यता : विनोबानगर जलमय, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. शहरातील विनोबा भावे नगर जलमय झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. जवळील हनुमान तलाव तुडूंब भरला असून तलाव फूटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. तलावाशेजारीच नागरिकांची येथे घरे आहेत.सतत पाऊस बरसल्याने पाणी साठ्यात वाढ झाली आहे. शहरातील विनोबा भावेनगर, श्रीरामनगर, गोवर्धन नगर, इंदिरानगर सखल भागात शेकडो घरात पाणी शिरले आहे. परिसरातील हनुमान तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.पाणी जाण्यास पर्याय नसल्याने तलाव फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिसरात रिकामे भुखंडावर पाणी साचल्याने तलावसदृश्य स्थिती येथे दिसत आहे.तलावातील पाणी ओव्हरफ्लो होवून अरूंद नालीतून ते पाणी वाहत आहे. शहरातील सांडपाणी याच नालीतून जाते. घरात शिरलेल्या नागरिकांची स्थिती बिकट झाली आहे. पाणी वाहून जाण्याकरिता येथे पर्यायी मार्ग नाही. घराबाहेर कसे पडावे असा प्रश्न नागरिकाना पडला आहे. घरासमोर तलाव निर्माण झाले आहे. येथे घरांनाही धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने येथे दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. पुन्हा पाऊस बरसला तर मोठी समस्या येथे निर्माण होईल. रात्री घरात प्रवेश कसा करावा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.