शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्याचे उद्घाटन शेतकरी विधवेच्या हस्ते करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 21:52 IST

तालुका निर्मितीचा प्रश्न चिघळत असताना तालुका कृती संघर्ष समितीने आदर्श उपस्थित करीत १४ तारखेला होऊ घातलेल्या तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन शेतकरी विधवा महिलेच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान कृती समिती तालुका निर्मितीबाबत व मतदानावर बहिष्कार घालण्याबाबतही ठाम आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला निवेदन : तालुका कृती संघर्ष समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : तालुका निर्मितीचा प्रश्न चिघळत असताना तालुका कृती संघर्ष समितीने आदर्श उपस्थित करीत १४ तारखेला होऊ घातलेल्या तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन शेतकरी विधवा महिलेच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान कृती समिती तालुका निर्मितीबाबत व मतदानावर बहिष्कार घालण्याबाबतही ठाम आहे.१४ फेब्रुवारीला कृषी विभाग, पंचायत समिती पवनी, जिल्हा परिषद भंडारातर्फे अड्याळ येथील बाजार ग्राऊंड परिसरात तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी अड्याळ तालुका निर्मिती संदर्भात जिल्हा प्रशासनासह शासनाला १४ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. ती मुदत १५ फेब्रुवारीला संपत आहे. परिणामी काळ्या फिती लावून निदर्शने करणे, लोकप्रतिनिधींना गावबंदी, मतदानावर बहिष्कार आदी निर्णय समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाचा काटेकोरपणे पालन करण्यात येत असून १४ तारखेला होवू घातलेल्या मेळाव्यात लोकप्रतिनिधींना येण्यासही आम्ही रोखू असा ठाम निर्णय समितीने घेतला आहे. या मेळाव्यात लोकप्रतिनिधीं ऐवजी कार्यक्रमाचे उद्घाटन शेतकरी विधवा महिलेच्या हस्ते करण्यात यावे, अशी मुख्य मागणी समितीच्यावतीने करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी खासदार मधुकर कुकडे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार रामचंद्र अवसरे आदी मान्यवर येणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे तीन दशकांपासून अड्याळ तालुका निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे.दरम्यान तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याला ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र सोहळ्याला उपस्थित राहणारे उद्घाटक व अतिथींचा विरोध होताना दिसत आहे. १२ दिवसांचा कालावधी लोटत असतानाही तालुका निर्मितीबाबत कुठल्याही हालचाली शासन स्तरावर झाल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.