शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

लॉकडाऊनमुळे हातमाग विणकरांना सूत मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

मुखरु बागडे। लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : कोरोना संकटात लॉकडाऊनचा फटका सर्वच उद्योग व्यवसायाना बसत असून विणकरांचे हातही रिकामे ...

ठळक मुद्देफटका : पालांदूर येथील नऊ विणकर कुटुंबांवर उपासमारीची वेळ

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : कोरोना संकटात लॉकडाऊनचा फटका सर्वच उद्योग व्यवसायाना बसत असून विणकरांचे हातही रिकामे आहे. सूत मिळत नसल्याने लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील नऊ कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.पालांदूर येथे नागपूर येथील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या अख्त्यारित नऊ विणकर कापड विणण्याचा व्यवसाय करतात. गरीब कुटुंबातील या मंडळीचा चरितार्थ त्यावरच चालतो. त्यामुळे लॉकडाऊनमुळे त्यांच्यासमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पालांदूर येथे तानबा धकाते, ताराचंद धकाते श्रीराम बोकडे, नत्थु नंदनवार भोजराज नंदनवार, रामदास धकाते, माधव नंदनवार, जाधव नंदनवार, छगन नंदनवार आदी विणकर व्यवसाय करतात.भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विणकर बांधव आहेत. यांत्रिकीकरणाच्यापुर्वी हा समाज त्यावरच उदरनिर्वाह करायचे. मात्र यांत्रिकीकरणाचे हातमाग मागे पडला. घरात दारिद्रय पोहोचले. पालांदूरात आजही ५००च्या वर विणकर समाज स्थिरावला आहे. त्यातील काही जण गुजरातच्या सुरतमध्ये कामाच्या शोधात गेले आहे. आता लॉकडाऊनने त्यांच्यापुढेही समस्या निर्माण झाली आहे. या समाजाला लॉकडाऊनच्या काळात शासकीय योजनांचा लाभ मिळाला नसल्याचे सांगितले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.पालांदूरच्या कापडाची ख्यातीपालांदूर येथे सिल्क कापड तयार केले जातात. दिवसभर विणकर फटफट आवाज करीत विणन्याचे काम करतात. तिक्ष्ण नजरेने विणकाम केले जाते. हाताने तयार केलेले कापड आकर्षक व टिकाऊ असल्याने त्याला मोठी मागणी आहे. मात्र सूत नागपूर येथील महामंडळाकडून पुरविल्या जात असल्याने ते खाजगीत विकू शकत नाही. सध्याच्या लॉकडाऊनमुळे सूतही मिळणे कठीण झाले आहे. परिणामी विणकर समाज अडचणीत सापडला आहे. आम्हाला तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी तानबा धकाते यांनी यावेळी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या