शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

यंत्राने हिरावली मजुरांच्या हातची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्याची कमतरता आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेती व्यवसाय सापडला आहे.

ठळक मुद्देशेती व्यवसाय संकटात : केवळ पेरणी व कोळपणीसाठी बैलांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाच-सहा वर्षांपासून सालगगड्यांचे पगार वाढल्याने व शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नाही. त्यामुळे बळीराजाने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम राहिलेले नाही. ‘हायटेक’ शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले तरी इतर अनेक समस्यांमुळे शेतकरी मुटाकुटीला आला आहे.कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्याची कमतरता आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेती व्यवसाय सापडला आहे. तसेच शेती कसण्यासाठी लागणाºया बैलजोडीचे दर वाढलेले आहेत. तसेच मजुरीने न उरकणारी कामे, दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी आपल्या शेतातील शेतीच्या मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. तर काही शेतकरी बैलजोडी असूनही मोजकी कामे बैलाद्वारे उरकून उर्वरित कामासाठी ट्रॅक्टरचा आधार घेत आहेत. बळीराजा शेतातील कामांबरोबर शेणखत घालणे आदी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करताना दिसून येत आहेत. तसेच खरीप व रबी हंगामातही पेरणीसाठी ट्रॅक्टरचा प्रयोग करताना दिसून येत आहे. केवळ पेरणी व कोळपणीसाठी बैलांचा वापर केला जात आहे.परंतु यंदा गारपिटीमुळे चाºयाची नासाडी मोठ्या प्रमाणात झाल्याने पशुधन कसे जोपासावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. धान्याच्या राशीसाठी ट्रॅक्टरवरील मळणीयंत्रे, किटक नाशकाची फवारणी ही ट्रॅक्टरवर पाण्याची टाकी ठेवून केली जात आहे. बैलगाडीच्या सहाय्याने मजूर लावून अथवा सालगडी ठेवून शेताची मशागत करताना येणारा खर्च व ट्रॅक्टरच्या सहाय्याने येणाऱ्या खर्चाचा ताळमेळ घातल्यास ट्रॅक्टरचा वापर परवडणारा आहे. परिणामी ट्रॅक्टरवाल्यांना रोजगार मिळत असला तरी इतर मजुरांचे हात रिकामेच आहे.सध्या शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केल्याने मशागतीचे कााम चांगले होते. तेच काम बैलाच्या सहाय्याने केल्यास कामास उशिर लागतो. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केलेली शेती महत्वाची असली तरी त्यामुळे रोजगार कमी झाल्याने बेरोजगारांचे हात वाढले आहेत.अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेतीची चांगली मशागत होते. त्यामुळे ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. परंतु ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने केलेल्या कामाचे पैसे त्यांच्या सोयीने घ्यावे लागतात.

टॅग्स :agricultureशेती