शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावरती डाव मोडला..., मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या आठवणीने पवनीवासीय शोकमग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 03:30 IST

पुढे इंजिनिअर होऊन तो सैन्यात रूजू झाला. आज त्याच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता, त्याला भेटण्यासाठी आम्ही जात होतो, पाणावलेल्या डोळ्यांनी मुलाच्या आठवणी सांगताना वीरमातेने हंबरडा फोडला तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.

नंदू परसावार / अशोक पारधीपवनी (भंडारा) : काश्मीर येथे झालेल्या चकमकीत भंडारा जिल्ह्याचा सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर हे शहीद झाले, त्यांचे पार्थिव ११ वाजता त्यांच्या गावात आणण्यात आले. एक वाजता त्यांच्या  पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार नाना पटोले, आम.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. पवनी नगरपालिकेने वैनगंगा नदी घाट परिसरात तशी व्यवस्था केली होती.

काश्मिरच्या राजोरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पवनीचा सुपूत्र मेजर प्रफुल अंबादास मोहरकर (३२) हे शहीद झाले. ही वार्ता रात्री पवनी तालुक्यात पसरताच त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी एकच गर्दी केली. घरी आईवडील नसतानादेखील शोकमय पवनीवासीय त्यांच्या घरासमोर एकत्रित होऊन आठवणींना उजाळा देत होते.

लहानपणापासूनच त्याला वाचनाची आवड होती. वडील नागपुरला गेले की खाऊऐवजी पुस्तके आणा, असे तो आग्रहाने सांगायचा. नागपूरच्या सोमलवार शाळेत शिकताना प्रहारच्या उन्हाळी शिबिरात तो भाग घ्यायचा. तेव्हापासूनच सैन्यात जाण्याची आवड त्याच्यात निर्माण झाली. पुढे इंजिनिअर होऊन तो सैन्यात रूजू झाला. आज त्याच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता, त्याला भेटण्यासाठी आम्ही जात होतो, पाणावलेल्या डोळ्यांनी मुलाच्या आठवणी सांगताना वीरमातेने हंबरडा फोडला तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.

मोहरकर परिवार मूळचे पवनी तालुक्यातील जुनोना येथील रहिवाशी असून अंबादास मोहरकर हे वलनी येथील महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक होते. सेवानिवृत्तीनंतर पवनीत भाईतलाव वॉर्डात घर बांधून ते स्थायिक झाले. मेजर प्रफुल यांची आई सुधाताई या शिक्षीका असून मोठा मुलगा मेजर तर लहान मुलगा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याला भेटण्यासाठी शनिवारी ते नागपूरहून पुण्याकडे निघाले होते. त्याचदरम्यान, मोठा मुलगा प्रफुल शहीद झाल्याची बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथून रात्री उशिरा ते पवनीला पोहोचले. प्रफुल्ल यांचे आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सोमलवार हायस्कुलमध्ये झाले. डेहराडून, खडकवासला पुणे येथे शिक्षण पूर्ण करून राहुरी येथे लेफ्टनंट या पदावर ते रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीने अल्पावधीतच ते मेजर पदावर पोहचले.मुलगा शहीद झाल्याचे दु:ख आहे, परंतु देशाची सेवा करताना शहीद झाल्याचा अभिमान वाटतो. देशाच्या सीमेवर संरक्षण करण्यासाठी कार्य करणा-या सैनिकांच्या संरक्षणासाठी शासनाने सतर्कता बाळगली पाहिजे. पाकिस्तानी लष्कराला शासनाने धडा शिकवावा.- सुधाताई मोहरकर, (प्रफुल्ल यांची आई)

प्रफुल्ल सोज्वळ व सुसंस्कृत होते. जावई असले तरी ते आम्हाला मुलाप्रमाणे होते. माझा मुलगा अभिषेक व प्रफुल्ल हे दोघेही एकाचवेळी सैन्यात अधिकारी म्हणून रूजू झाले. प्रफुल्ल हे व्हॉलिबॉल, फुटबॉल व हॉकीचा उत्तम खेळाडू होते.- विजय शिंदे, पुणे. (प्रफुल्ल यांचे सासरे)