शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सिहोरा येथे बँकेसमोर ग्राहकांची अर्धा किमी रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने जनधन खात्यावर खातेदारांना आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बचत खात्यात निधी वळते करण्यात आल्याने त्यांनी बँकेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. जनधन खातेदार, शेतकरी तथा निराधार योजनेची लाभार्थी यांनी एकाच वेळी बँकेत पैशाकरिता धाव घेतली असल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचे पालन: अनेक वाहनांवर पोलीसाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : गावाची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात बँकेत खातेदारांची वाढती गर्दी आहे. खातेदारांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे पोलिसांनी बजाविताच अर्धा किमी अंतरपर्यंत लांबच लांब रांगा तयार होत आहेत.केंद्र शासनाने जनधन खात्यावर खातेदारांना आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बचत खात्यात निधी वळते करण्यात आल्याने त्यांनी बँकेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. जनधन खातेदार, शेतकरी तथा निराधार योजनेची लाभार्थी यांनी एकाच वेळी बँकेत पैशाकरिता धाव घेतली असल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे. सिहोरा गावात असणाऱ्या बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँकेत खातेदारांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी खातेदारांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना केल्या असता अर्धा किमी अंतर्गत लांबच लांब रांग तयार होत आहेत. दरम्यान बँकाची कालावधी कमी तासाचे असल्याने अनेक खातेदारांना माघारी परतावे लागत आहेत.अल्प कालावधीत कामे पुर्ण करण्यासाठी बँकानी टोकन पध्दत सुरु केली असली तरी काही वेळेनंतर सोशल डिस्टन्सिंग पालन करताना कुणी दिसून येत नाही. बँकातील गर्दी टाळण्याकरिता व्यवसाय प्रतिनिधी नियुक्त करण्यात आली आहेत. याप्रतिनिधीकडे खातेदारांची झुंबड दिसून येत आहे.एटीएमला सुरक्षा गार्डाची नियुक्ती नाहीकोरोना व्हायरसचा संसर्ग थांबविण्याकरिता उपाययोजना सांगितले जात आहे. बँक ऑफ इंडिया शाखेअंतर्गत एटीएमची सोय करण्यात आली आहे. परंतु या एटीएममध्ये सुरक्षा गार्डाची नियुक्ती करण्यात आली नाही. एटीएममध्ये ग्राहकांची गर्दी होत असल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. या एटीएमला सुरक्षा गार्डाची नियुक्ती करण्याची गरज असतांना दुर्लक्ष करण्यात आले आहे. गावात अनेक दुचाकी वाहनावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

टॅग्स :bankबँक