शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

निम्मे भंडारा शहर अंधारात

By admin | Updated: June 11, 2014 23:08 IST

मंगळवारला सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीज पुरवठा सुरु झाला असला तरी बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना

वीज कंपनीविरूध्द आक्रोश : नागरिकांनी काढली रात्र उकाड्यात भंडारा : मंगळवारला सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीज पुरवठा सुरु झाला असला तरी बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना रात्र अक्षरक्ष: उकाड्यात काढावी लागली. एकीकडे ऊन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असताना वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागला. दुपारी ५ वाजताच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी १२ वाजतापर्यंत बंदच होता. वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून काही वेळात वीज पुरवठा सुरळीत होईल, या हेतूने वाट पाहत राहिले. त्यानंतर तक्रार नोंदवूनही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. तक्रार नोंदणी केंद्र बेपत्तावीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार नोंदणी कार्यालयात (२५२३५५) या क्रमांकावर संपर्क साधला असता तिथे संपर्क झाला नाही. हे कार्यालय कुठे असे विचारले असता, वीज कंपनीचे अधिकारी पांडे महालात हे कार्यालय असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी पांडे महाल गाठले असता तिथे कार्यालय नसल्याचे समोर आहे. अधिक शोध घेतला असता एका गल्लीबोळात हे कार्यालय दिसून आले. तिथे तक्रार नोंदविल्यानंतर लाईनमन पाठवितो, एवढेच उत्तर कर्मचाऱ्याने दिले.त्यानंतर उपविभागीय अभियंता अमित परांजपे यांना ६००७, ६००८, ६००९, ६०१० यांना या खांबावरून वीज पुरवठा बंद असल्याचे सांगितले. त्यांनी कनिष्ठ अभियंत्याशी संपर्क साधण्यासाठी सांगितले. कनिष्ठ अभियंत्यांचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नागपूर मुख्यालयातील मुख्य अभियंता कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांच्याशी संपर्क साधून विजेची समस्या सांगावी लागली. वीज गेली तर वीज ग्राहकांचे समाधान करणारी यंत्रणा वीज वितरण विभागाकडे नाही.उपविभागीय अभियंता प्रसाद रेशमे हे भंडाऱ्यात असताना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जी यंत्रणा उभारली होती, ती सर्व यंत्रणा अलिकडच्या काळात कोलमडून पडली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.चार दिवसांपूर्वी कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये बिघाड आल्यानंतर गडेगाव उपकेंद्रातून पाच फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भंडारा व लाखनी तालुक्यातील ३२५ गावातील नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली़ वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे नागरिक हैरान झाले असून असा प्रकार वारंवार होत असल्यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)