शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी व भाजपात उमेदवारीवरून घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:56 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. रविवारी सायंकाळी निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यास विद्यमान खासदारांसह दोघांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपाकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपा तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे.

ठळक मुद्देसंभ्रम कायम : भंडारा-गोंदियात राजकीय हालचालींना वेग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. रविवारी सायंकाळी निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यास विद्यमान खासदारांसह दोघांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपाकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपा तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अद्यापर्यंत कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारी घोषित केली नाही. मात्र लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्ष करतील. अद्यापपर्यंत नावे पुढे न आल्याने मतदारात संभ्रम असून इच्छूक आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा करित आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे राजकारण सध्या राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले, विद्यमान खासदार मधुकर कुकडे, भाजपाचे आमदार डॉ. परिणय फुके, आमदार चरण वाघमारे यांच्या भोवती फिरत आहे. गत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे विजयी झाले. भाजपाचा येथे पराभव झाला. हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीने येथील लोकसभा निवडणूक प्रतिष्ठीत घेण्याची माहिती आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजून आपले पत्ते उघड केले नाहीत. ते निवडणूक लढविणार की नाही या बाबत उत्सूकता शिगेला पोहचली आहे. त्यातच विद्यमान खासदार मधुकर कुकडे दिल्लीला रवाना झाले आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसकडून वर्षा पटेल, विजय शिवणकर, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांची नावे चर्चेत आहे. आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे लक्ष लागले आहे. भाजपा तगड्या उमेदवाराच्या शोधात असून माजी खासदार शिशुपाल पटले, डॉ. खुशाल बोपचे, आमदार डॉ. परिणय फुके यांच्यासह भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, राजेंद्र पटले, संजय कुंभलकर यांची नावे चर्चेत आहेत.भाजपा उमेदवाराच्या घोषणेची प्रतीक्षाभाजपाच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाने उमेदवारी घोषित केल्यानंतरच खासदार प्रफुल्ल पटेल आपले पत्ते उघड करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर निवडणूक लढवावी याकरिता दबाव वाढत आहे. एकंदरीत भंडारा-गोंदिया मतदार संघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. इतर पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. अवघ्या काही दिवसातच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार यात शंका नाही.