शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या पुलाला बसतात हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 22:37 IST

तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारातील वैनगंगा नदीवर जूने पूल आहे.

ठळक मुद्दे२५ वर्षांपासून दुरुस्ती नाही : पूलावर खड्डेच खड्डे

मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारातील वैनगंगा नदीवर जूने पूल आहे. मागील ५२ वर्षापासून अविरत सेवा प्रदान करणाºया पुलावरील डांबरीकरण उखडले असून डांबराचे उंचवटे धोकादायक ठरले आहे. पुलाच्या खांबात बेरिंगची ग्रासिंग मागील २५ वर्षापासून करण्यात आले नाही. जड वाहनामुळे पूलाला हादरे बसत आहेत. अतिशय वर्दळीच्या पूलाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष आहे.तुमसर-गोंदिया राज्य महामार्ग क्रमांक ३३५ वर माडगी शिवारात वैनगंगा नदीवर सुमारे ३५० मीटर लांब पूल तयार करण्यात आले होते. या पूलाला सुमारे ५२ वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. हा पूल सध्या धोकादायक ठरत आहे. पूलावरील पोचमार्गाचे डांमरीकरण ठिकठिकाणी उखडले आहे. त्यामुळे काही ठिकाणी डांबराचे ऊंचवटे तयार झाले आहेत. ते वाहनाकरिता धोकादायक ठरले आहे. दूचाकी स्वारांचा जीव येथे धोक्यात आहे. पावसाळ्यात पाणी येथून सरळ सिमेंट खांबात शिरते. त्यामुळे पुलाचे खांब कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूलावर अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचले राहते.या पूलाच्या खालील खांबात बेअरिंंग आहेत. बेअरगिंमुळे पूलाला हादरे बसत नाही जड वाहन पूलावरून गेल्यावर पूलाला हादरे बसतात तथा आवाज येत आहे. मागील २५ वर्षापासून दुरूस्ती झालेली नाही. यामुळे पूलाचे आयुष्य कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. अदानी पॉवरचे तथा रेतीचे ट्रक येथून धावतात. क्षमतेपेक्षा जास्त साहित्य त्यात असते. पूलावरून हे वाहन जातानी पूलाला मोठे हादरे बसतात. पूलात मोठ्या प्रमाणात सध्या कंपन होणे सुरू झाले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी मोहाडी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. परंतु अजुनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. अपघात घडल्यावर कारवाई होणार काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.पूलाच्या दुरूस्तीला सुमारे ४० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मागील दोन वर्षापासून दुरूस्ती करण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे. एका महिन्यापुर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंत्यांनी या पूलाची पाहनी केली होती हे विशेष. येथे पूलाची लांबी जास्त आहे. नदीचे पात्र रूंद आहे. दरवर्षी पूलाची देखभाल करणे गरजेचे आहे.अभियंता प्रभारीचमोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभागीय अभियंता विजया सावरकर यांचे स्थानांतरण पवनी झाले आहे. सध्या त्यांच्याकडेच मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याचा प्रभार दिला आहे. येथे नियमित उपविभागीय अभियंत्यांची नियुक्तीची गरज आहेमागील दोन वर्षापासून पूलाला सतत हादरे बसत आहेत. पूलावरील डामरीकरण ठिकठिकाणी उखडले आहे. बेअरिंगचे ग्रिसींग अजुनपर्यंत करण्यात आले नाही. दररोज या पूलावरून हजारो ट्रक धावतात. सार्वजनिक बांधकाम विभाग येथे दुर्लक्ष करीत आहे. याप्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य भंडारा.माडगी पूलावरील प्रत्यक्ष कामाला दसºयानंतर सुरूवात होणार असून सुमारे ४७ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्य अभियंत्यांनी पूलाची पाहणी केली आहे. बेअरिंग रिपेअरींगची कामे केली जातील.पी.एन. माथुरकर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडी.