लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परमपूज्य श्री विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र भंडाराच्यावतीने श्री गुरुचरित्र पारायण अंतर्गत संकल्पपूर्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात श्रींची पालखी मिरवणूक, किर्तन व महाप्रसाद वितरणाने महोत्सवाची सांगता करण्यात आली.श्री नृसिंह भगवान सरस्वती महाराज (कारंजा) यांच्या जयंतीनिमित्त या संकल्पपूर्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. रंजीव पैठनकर यांनी गुरुचरित्र पारायण सादर केले. म्हाडा कॉलनी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मिरवणूक फटाक्यांची आतिषबाजी व ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली. यावेळी साधकवर्ग व म्हाडा येथील रहिवासी सहभागी झाले होते. १८ वर्षापासूंनची परंपरा गुरुदेव भक्तांनी कायम राखली आहे. या महोत्सवासाठी प्रा. पैठणकर यांच्यासह संगित शिक्षक विनोद पत्थे तथा विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्राच्या साधकांनी तथा महिला भक्तांनी सहकार्य केले.
गुरुचरित्र संकल्पपूर्ती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:01 IST
परमपूज्य श्री विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र भंडाराच्यावतीने श्री गुरुचरित्र पारायण अंतर्गत संकल्पपूर्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुचरित्र संकल्पपूर्ती महोत्सव
ठळक मुद्देपरमपूज्य श्री विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र भंडाराच्यावतीने श्री गुरुचरित्र पारायण