शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर

By admin | Updated: July 19, 2016 00:35 IST

भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, ...

आज गुरूपोर्णिमा : शहापुरात महान सत्संग कार्यक्रम, भाविकांची उपस्थितीभंडारा : भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. विनम्र झाल्याशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, असे मार्मिक तथा आत्मिक प्रवचन सद्गुरुदेव सतपाल महाराज यांच्या आत्मअनुयायी व अनुभवी साध्वी मैत्रेय बाईजी यांनी केले.गुरुपौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून मानव उत्थान सेवा समिती शाखा भंडाराच्यावतीने १८ जुलै (सोमवारी) सकाळी शहापूर येथील गोपीवाडा मार्गावर असलेल्या स्वागत लॉन येथे आयोजित महान सत्संग समारोहात त्या बोलत होत्या. यावेळी मंचकावर साध्वी दिप्ती बाईजी, साध्वी बागीशा, साध्वी महाश्वेता, साध्वी दिक्षीता, महात्मा तुलसीजी, आदी संतगण उपस्थित होते. सत्संगाची सुरूवात दीपप्रज्वलन तथा सद्गुरु सतपाल महाराज यांच्या चरणपादुकाचे पुजन करून करण्यात आली. संत्संगादरम्यान बालकांनी पंढरीची वारी यावर आधारीत नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सर्व संतांनी गुरूंची श्रेष्ठता व महिमा यावर आधारीत असे मौलिक प्रवचन केले. दुपारी ३ वाजता महाप्रसादाने संत्सगाची सांगता करण्यात आली. यावेळी भंडारा, कोदामेढी, अड्याळ, नागपूर, लाखनी, पवनी, चोवा-निमगाव यासह अन्य गावातील आत्मिक भाविकगण उपस्थित होते.गुरूशिष्याची परंपरा आजही कायम‘‘गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुदेर्वो महेश्वर: गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ’’आषाढ शुद्ध पौर्णिमा या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. गुरूंना देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आजही याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत कायम आहे. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. कृष्ण, सुदामा-सांदिपनी, जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.