व्याख्यानमाला : जिम्मे त्सुलट्रीम यांचे प्रतिपादनजवाहरनगर : माणसानी माणसावर प्रेम करणारे देश बोटावर मोजण्याइतके आहे. त्यात भारत हा अग्रक्रमीक देश आहे. याच देशात तिबेट जनतेला जीवनाचा मार्ग मिळावा. जनु गुरु शिष्याचे नाते अलौकिक झाले असे प्रतिपादन भारत तिबेट समन्वयक जिम्मे त्सुलट्रीम यांनी केले.महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यलय बेला येथे तिबेट व त्यांची समस्या या विषयावर आयोजित व्याख्यानमाला प्रसंगी जिम्मे त्सुलट्रीम बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अमृत बंसोड हे होते. यावेळी गुलशन गजभिये, संदेश मेश्राम, असित बागडे, संजय बंसोड, प्राचार्य अर्जुन गोडबोले उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात अमृत बन्सोड म्हणाले की, युवा पिढी जोपर्यंत नेतृत्व स्वीकारत नाहीत तोपर्यंत चीनमध्ये बदल होणे शक्य नाही. याप्रसंगी गुलशन गजभिये व संदेश मेश्राम यांची भाषणे झाली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संचालन प्रा. विनोद मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. मोरेश्वर गेडाम यांनी मानले. कार्यक़मासाठी प्रा. सुधाकर साठवणे, प्रा. शुभांगी बंसोड, प्रा. सुलोचना कुंभारे, प्रदीप गजभिये, हरिश्चंद्र धांडे, आनंद गजभिये, धनराज मते यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
गुरु-शिष्याचे नाते अलौकिक
By admin | Updated: October 19, 2015 00:54 IST