शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

रोग, कीडीसंदर्भात बांधावर कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST

तालुक्यातील खमारी बुट्टी, बेलगाव, मंडनगाव, मांडवी येथील शेतकºयांना धान पिकावरील गादमाशी, खोडकिडा, कडाकरपा या रोग किडींची ओळख व त्यावरील उपायोजना संबंधी प्रात्यक्षिकातून माहिती दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील लागवड केलेल्या पट्टापद्धत, दोरीच्या साह्याने लागवड केलेली श्री पद्धत, जिओ-टॅगिंग, क्रॉपसॅप सर्वेक्षणाचा आढावा घेतला.

ठळक मुद्देपिकांची पाहणी : फवारणीबाबत काळजी घ्या, कीड रोखण्यावर उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कधी संततधार पाऊस तर कधी ऊन पडत असल्यामुळे धान पिकावर विविध किड रोगांचा प्रादूर्भाव वाढत चालला आहे. यासाठी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तालुक्यातील विविध गावात भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धान पिकावरील कीडरोग व्यवस्थापन व फवारणीबाबत मार्गदर्शन केले.तालुक्यातील खमारी बुट्टी, बेलगाव, मंडनगाव, मांडवी येथील शेतकऱ्यांना धान पिकावरील गादमाशी, खोडकिडा, कडाकरपा या रोग किडींची ओळख व त्यावरील उपायोजना संबंधी प्रात्यक्षिकातून माहिती दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील लागवड केलेल्या पट्टापद्धत, दोरीच्या साह्याने लागवड केलेली श्री पद्धत, जिओ-टॅगिंग, क्रॉपसॅप सर्वेक्षणाचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांच्यासोबत भंडारा मंडळ कृषी अधिकारी विजय हुमणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी सहाय्यक हेमा तिडके, कृषीमित्र नाशिक वडोळे, शेतकरी उपस्थित होते.सध्या पिके समाधानकारक दिसत असली तरी सातत्याने वातावरण बदल होत असल्याने बारीक धानावर गादमाशी, खोडकिडा, पानावरील ठिपके, कडा करपाचा प्रादूर्भाव वाढत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या मार्गदर्शनात युरिया खताचा वापर टाळून व कोणती औषध फवारणी केली पाहिजे व पिकांची कशी काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी भंडारा मंडळ अधिकारी विजय हुमणे यांनी शेतकºयांना दररोज सकाळी पिकांची नियमितपणे पाहणी करण्याचा सल्ला दिला.अशी करावी तजवीजधान पिकावर सातत्याने बदलणाºया वातावरणामुळे कडाकरपा खोडकिडा माशीचा प्रादूर्भाव काही ठिकाणी दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी कडा, करपा रोगासाठी स्टेप्टोसायक्लीन झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रती दहा लीटर पाण्यात, करपा रोगासाठी काबँन्डिझम ५० टक्के, गादमाशीसाठी फिप्रोनिल ०.३ टक्के २५ किलो प्रती हेक्टरी खोडकिडीसाठी कॉरटॉप हॉयड्रोक्लोराईड ५० टक्के, एएसपी १० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी केले आहे.यावेळी पिकांच्या नुकसानीचा आढावाही घेण्यात आला.

टॅग्स :agricultureशेती