लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना संसर्गाचा फटका सराफा बाजाराला पहिल्यांदाच बसत आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सराफा बाजार बंद राहण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. जिल्ह्यात सर्वात मोठा सराफा बाजार तुमसर येथे असून तुमसरमध्ये ४० ते ४२ सोन्याचे दुकाने आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या फटक्याने सराफा बाजाराची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.बाजार बंदचा परिणाम झाल्याने जवळपास दीड ते दोन कोटींचा फटका बसणार असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली. तुमसर येथे जिल्ह्यातूनच नव्हे तर मध्यप्रदेशातूनही सोने खरेदीसाठी ग्राहक येत असतात. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली आहे.नववर्षातील गुढीपाडव्याच्या या सणाला कोरोनाचे सावट पडले आहेत. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजन पडले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरासमोर आनंदाची गुढी उभारून सण साजरा करण्याची पद्धत आहे. अनेकजण गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोने खरेदी, वाहन खरेदी तसेच घर, जागा खरेदी करण्यासाठी इच्छूक असतात. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केलेली खरेदी शुभ मानली जाते.तुमसरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोने खरेदीची मोठी आर्थिक उलाढाल होते. अनेक सराफा व्यापाºयानी गुढीपाडव्याच्या सणासाठी मोठी जय्यत तयारी केली होती. वर्षातून एकदा येणाºया गुढीपाडवा सणाची अनेकांना आतुरता लागलेली असते. भारतीय संस्कृतीत दिवाळी, दसरा, गुढीपाडवा सणाला विशेष महत्व आहे. तुमसर शहरात कोरोना संसर्गामुळे सराफा बाजारपेठेला मोठा फटका बसला असल्याची व्यापाऱ्यांनी माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे अनेक जणांना यावर्षी सोने खरेदी करता येणार नाही. मध्यप्रदेशातील खरेदी करिता येणाºया ग्राहकांनादेखील याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खरेदीदारांसह सराफा व्यवसायीकांचा मोठा हिरमोळ झाला आहे. त्यामुळे सोन्याची झळाळी यावर्षी तरी चकाकणार नाही, असे चित्र दिसत आहे.
गुढीपाढव्याला सराफा बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST
बाजार बंदचा परिणाम झाल्याने जवळपास दीड ते दोन कोटींचा फटका बसणार असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली. तुमसर येथे जिल्ह्यातूनच नव्हे तर मध्यप्रदेशातूनही सोने खरेदीसाठी ग्राहक येत असतात. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली आहे.
गुढीपाढव्याला सराफा बाजार बंद
ठळक मुद्देदोन कोटींची उलाढाल ठप्प : तुमसर सोने खरेदीची प्रमुख बाजारपेठ