शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष कटाई व वन्यप्राणी शिकारीच्या घटनांत वाढ

By admin | Updated: September 2, 2014 23:29 IST

वनपाल व वनरक्षकांचा मागील नऊ दिवसांपासून संप सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय कमिटीची स्थापना केली आहे. संपादरम्यान जिल्ह्यातील काही वनपरिक्षेत्रात वृक्ष

भंडारा : वनपाल व वनरक्षकांचा मागील नऊ दिवसांपासून संप सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय कमिटीची स्थापना केली आहे. संपादरम्यान जिल्ह्यातील काही वनपरिक्षेत्रात वृक्ष कटाई जोमात सुरू असून वन्यप्राण्यांच्या शिकारींचेही प्रमाण वाढले आहे. या संपाचा लाकूड वाहतुकीच्या परवान्यासाठी अडसर निर्माण झाला आहे. मध्यप्रदेशातील शिकारी टोळी या संपाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने चांदपूर परिसरात दाखल झाल्याचे समजते.संपामुळे वनकर्मचारी कर्तव्यावर नाहीत. त्यामुळे याचा फायदा उचलून अवैध वृक्ष कटाई व वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील रावणवाडी, पिटेझरी, उमरझरी, नाकाडोंगरी, लेंडेझरी, चिखली, पिटेसूर व चांदपूर या वनक्षेत्रात शिकारी व वृक्षकटाई करणाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. नाकाडोंगरी व चिचोली परिसरात फासेपारध्यांनी वन्यप्राण्यांची शिकार केल्या आहेत. या शिकाऱ्यांनी हरीण, चितळ, सांबर, ससा, मोर व अन्य प्राण्यांच्या शिकारी केल्याचे समजते. या प्राण्यांचे मांस खाण्याला चविष्ट असल्याने त्याची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. वनकर्मचारी संपावर असल्याने आता शिकाऱ्यांच्या मनात कुठलीही भीती राहली नसल्याने शिकार होत आहे. वनकर्मचारी संपात सहभागी असल्याने कारवाई किंवा त्याची साधी दखलही कोणी घेणारे अधिकारी वनविभागाकडे नाहीत. त्यामुळे या शिकाऱ्यांचे फावत आहे. तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांदपूरचे क्षेत्र सुमारे ३ हजार हेक्टरात विस्तीर्ण आहे. हे क्षेत्र घनदाट जंगलाने व्याप्त असल्याने ते अतिसंवेदनशिल क्षेत्र म्हणून ओळखले जाते. संपाचा फायदा घेऊन मध्यप्रदेशातील काही शिकारी टोळी चांदपूर जंगलात दाखल झाले आहे. मात्र परिसरातील नागरिक व वनमजुरांच्या नजरेस पडल्याने शिकाऱ्यांनी जागा बदलवून दुसरीकडे आपले ठाण मांडले आहे. संपादरम्यान मोठी शिकार करण्याच्या उद्देशाने ही टोळी चांदपूर क्षेत्रात दबा धरून बसल्याचे संपावरील वनकर्मचाऱ्याने लोकमतला सांगितले.लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वाहतुक परवाना देणारे अधिकारी संपात सहभागी असल्याने अनेक शेतकरी, खासगी कटाईदार व ठेकेदारांकडील कटाई केलेले वृक्ष पडून आहे. पावसाचे दिवस असल्याने याचा विपरीत परिणाम वाहतुकीवर होणार आहे. अनेक ठिकाणावरून लाकडांची बिना टिपीने वाहतुक केली जात आहे. नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना वाहन तपासणीचा अधिकार नसल्याने सध्या अवैध वाहतुक राजरोसपणे सुरू आहे. जिल्ह्यात ५७ आरामशिन आहेत. या आरामशिनवर काही परवानाधारक लाकूड कटाईसाठी येत आहे. तर काही लाकूड बिना परवानगीचा कटाई केल्या जात असल्याचेही समजते. (शहर प्रतिनिधी)