शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात वाढली मंडईची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:12 IST

दिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, दिव्यातील उजळणाºया पणतीचा सण. झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरु होणाºया मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी.

ठळक मुद्देझाटीपट्टीतील नाटकांना पसंती : उत्सवामुळे कलावंतांना सुगीचे दिवस

रंजित कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहदुरा : दिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, दिव्यातील उजळणाºया पणतीचा सण. झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरु होणाºया मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी. पाच दिवसांचा दिवाळी सण आटोपताच मंडई उत्सवाची धामधूम सुरु होणार आहे. परिणामी ग्रामीण भागात जत्रेचा माहोल दिसणार आहे.तसं बघितले तर दिवाळी उत्सवाची खरी मजा ही ग्रामीण भागात आयोजित होणाºया मंडई उत्सवाची असते. दिवाळी सण सुरु होताच ग्रामीण भागात मंडईला सुरुवात होत असते.मंडईनिमित्त आयोजित करण्यात येणाºया कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त झाडीपट्टीतील नाटकांना म्हणजेच संचाच्या नाटकांना प्रेक्षकांची पहिली पसंती असते. त्याचबरोबर तमाशा, दंडारी, गोंधळ, कव्वाली, आमदंगल आणि आंबट शौकीनांसाठी लावणीच्या आड हंगामे आयोजित केले जातात. काही का असोना पण मंडई उत्सवामुळे कलावंतांना त्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते.महिनाभरापासून आयोजक मंडई उत्सवाच्या कामाला लागत असतात. मंडई उत्सवाला डेकोरेशनची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे महिनाभरापासून डेकोरेशन बुक केले जातात.मंडईला पाहुण्यांचे आदान प्रदान होत असते. नातलग एकमेकांना गावी मंडईनिमित्त का होईना पण भेटीगाठी घेत असतात. लहान मुलांपासून तर तरुण, मोठ्यांना मंडईचे खासे आकर्षण दिसून येते. विशेष करून तरुण मुलामुलींना मंडई उत्सव मोठी पर्वणीच घेऊन येणारा ठरतो.मंडई उत्सव तरुण, मुलांमुलींसाठी भावी जोडीदाराची निवड करण्याचे एक केंद्रस्थान सुद्धा मंडईला ग्रामीण भागात विशेष असे महत्व दिसून येतो.दिवाळी सण सर्वांसाठी आनंदाचे, उत्सवाचे आणि हर्षोल्लास घेऊन येणारा सण असतो आणि त्यात मंडई उत्सव ग्रामीण नागरिकांसाठी आनंदाची पर्वणीच घेऊन येणारा ठरत असतो. पंधरा ते वीस दिवस चालणाºया मंडई उत्सवाची मजा काही वेगळीच असते हे मात्र विशेष.ग्रामीण भागात मंडईला विशेष महत्व असते. सकाळ सत्रापासून आप्तस्वकीयांचे येणे जाणे सुरु होते. विशेष म्हणजे सोयरकीच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जाते.दिवाळीचा फटाका फुटताच सुयोग्य वर वधू यांच्या लग्नाचा बार उडविण्याचा बेत आखला जातो. त्यात मंडईच्या बहाण्याने भेटी गाठी वाढविण्यावर भर दिला जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात संबंध वाढीला लागतात. दरम्यान या उत्सवाच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल सुद्धा होत असते.