शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी मुख्यधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: May 8, 2016 00:36 IST

पालिका प्रशासनाकडून शहरातील नळजोडणी धारकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येते.

आश्वासनानंतर घेराव मागे : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलनभंडारा : पालिका प्रशासनाकडून शहरातील नळजोडणी धारकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येते. मात्र वैनगंगेचे पात्र ईकोर्निया व रासायनिक द्रव्यामुळे दूषित झाले आहे. हे पाणी पिण्यास सोडण्यात येत आहे. यामुळे संतप्त विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने पालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र देवतळे यांना आज घेराव घालण्यात आला. दूषित पाणी पिल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत पालिका व जिल्हा प्रशासनाला अनेकदा निवेदन देवूनही या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आज शनिवारला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी देवतळे यांना घेराव घालण्यात आला. यावेळी वंजारी यांनी नागरिकांच्या पिण्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले व नदीपात्रात पसरलेली ईकॉर्निया नष्ट करण्याची मागणी केली. चर्चेदरम्यान मधुकर कुकडे यांनी वैनगंगा नदी ही गोसीखुर्द धरण बनण्यापुर्वी स्वच्छ होते. नदीचे पाणी पिण्यायुक्त होते आता नदी दूषित झाल्याने पिण्याचे आरोग्य बिघडत आहे. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी देवतळे यांनी शिष्टमंडळाला पिण्याचे पाणी जलसंपदा विभागाकडून विकत घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठ्याचे काम जलसंपदा विभागाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी देवतळे यांनी यावेळी दिले. यावेळी तुषार हट्टेवार, अर्जुन सुर्यवंशी, केशव हूड, दामोधर क्षीरसागर, योगेश्वरी कोचे, लोकेश गोन्नाडे, भारत चौधरी, देविदास गभने, जाधवराव साठवणे, गोविंदराव चरडे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)