शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांबाला टेकूचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:43 IST

सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे.

ठळक मुद्देखांब कोसळण्याची भीती : सक्करधरा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे.नाकाडोंगरी पंचायत समिती अंतर्गत समावेश असणाऱ्या धुटेरा गट ग्रामपंचायतच्या हद्दीत सक्करधरा गाव आहे. या आदिवासी गावाचा प्रशासकीय कारभार १८ कि.मी. अंतरावरून धुटेरा ग्रामपंचायत मधून करण्यात येत आहे. यामुळे गावात जलद गतीने विकास प्रभावित झाला आहे. या गावात समस्या आ वासून उभ्या आहे. गावातील प्रमुख मार्ग शेजारी असणारा जीवंत विद्युत खांब तुटला आहे. या खांबावरून गावात विजेचा प्रवाह सुरु आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. जीवंत विद्युत खांब तुटल्याने गावकऱ्यांनी संभावित धोका टाळण्यासाठी खांबाला टेकूचा आधार दिला आहे. या खांबाची कोसळण्याची भीती असल्याने गावकऱ्यांनी दोरा नी बांधून ठेवले आहे.दोरी तुटल्यास गावात आपत्ती येण्याची शक्यता आहे. यामुळे गावकºयात भीती आहे. या खांबाला काही लाकडाचे टेकू लावण्यात आले आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी गोबरवाही वीज वितरण कंपनीचे कार्यालयात माहिती दिली आहे. परंतु दखल घेण्यात आले नाही. याच खांबाचे नजीक गावातील अंगणवाडी इमारत आहे. मैदानात मुले खेळत असल्याने अपघाताची शक्यता आहे. याशिवाय अंगणवाडी इमारत जीर्ण झाली आहे.या अंगणवाडीत असुविधा असताना समस्या निकाली काढण्याचे प्रयत्न होत नाही. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. लोकप्रतिनिधीचे या गावाचे विकास कार्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गावात ३०५४ अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम मंजूर करण्यात आल आहे. या बांधकामाचे कंत्राट लोकप्रतिनिधींना आहे. गावात त्यांचे येणे जाणे असताना तुटलेल्या विद्युत खांबाकडे त्यांनी नजरेआड केले आहे. आदिवासी गावकऱ्यांना अज्ञानाचा फायदा घेण्यात येत आहे. सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात येत असताना साधी चौकशी करण्यात येत नाही. गावात अनुशेष असताना पाणी समस्या सोडविण्यासाठी सौर पंप गृह मंजूर करण्यात येत नाही. यामुळे गावकरी कसरत करीत आहेत.जीवंत तुटलेला विद्युत खांब बदलविण्यासाठी जलद गतीने कामे करण्यात येत आहेत. नवीन खांब लावण्यात येत आहे.-ए.डी. पंधरे, शाखा अभियंता गोबरवाहीतुटलेला विद्युत खांब कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खांब कोसळण्याची भीती आहे. गावाला विकासात वाळीत टाकण्यात येत असल्याने अन्याय होत आहे.-संजय सरोते, सदस्य ग्रा.पं. सक्करधरा