शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ कात टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:59 IST

भंडारा जिल्ह्यातील एकमेव बंद असणाऱ्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. पावणे दोन कोटी रुपये खर्चाच्या विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन पर्यटनस्थळात करण्यात आले असून येत् या काही दिवसात पर्यटनस्थळाचे विकास कार्यांना गती दिली जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.

ठळक मुद्देचरण वाघमारे यांचे प्रतिपादन : पर्यटनस्थळात विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यातील एकमेव बंद असणाऱ्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. पावणे दोन कोटी रुपये खर्चाच्या विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन पर्यटनस्थळात करण्यात आले असून येत् या काही दिवसात पर्यटनस्थळाचे विकास कार्यांना गती दिली जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.सिहोरा परिसरात असणाºया ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळात मंजूर १ कोटी ८४ लाख रुपये स्वखर्चाच्या विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, पंचायत समिती सभापती रोशना नारनवरे, बंडू बनकर, तालुकाध्यक्ष राजेश पटले, अशोक पटले, सरपंच उर्मिला लांजे, मुन्ना फुंडे, रेखा नेवारे, देवानंद लंजे, हेमराज लंजे उपस्थित होते. आयोजित पर्यटनस्थळात विधीवत विकास कामाची पूजा अर्चना करणयत आली. यावेळी आ.वाघमारे पुढे म्हणाले, भंडारा जिल्ह्यात एकमेव पर्यटनस्थळ मंजूर आहे. या पर्यटनस्थळाला अपेक्षित ठेवण्यात आले असल्याने गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. या पर्यटनस्थळाला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नियंत्रणात हे पर्यटनस्थळ आता कात टाकणार आहे. पर्यटनस्थळात पावणेदोन कोटी रुपये खर्चाच्या विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. पर्यटनस्थळात विकासाचा हा ट्रेलर आहे. पूर्ण चित्रपट आता शिल्लक आहे. याच पर्यटनस्थळाचे शेजारी आराध्य दैवत हनुमान देवस्थान आहे. दर्शनासाठी भाविक येत असल्याने चुल्हाड ते चांदपूर रस्त्याचे नवीनीकरण करण्यात आले आहे. पर्यटन आणि देवस्थान असा सुरेख संगम असणाºया चांदपूर परिसराचा विकास करण्यास निधी कमी पडू दिले जाणार नाही. याशिवाय ७३ गावातील ४० हजार हून अधिक शेतकºयाने सोयीकरिता सिहोरा गावात मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण करण्यात आले आहे. शेतकºयांचे संपर्कात असणारे सर्व विभाग एकाच व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. निश्चितच शेतकºयांना याचा लाभ घेत आहे. सिहोरा परिसरात नद्या, निसर्ग व उद्यन्मुख केंद्र आहे. या परिसराला विकासाची जोड दिली पाहिजे. याच दिशेने प्रयत्न केले जात आहे. बपेरा गावात असणारा शासकीय व रिकामे इमारतीचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. चांदपूर पर्यटनस्थळाचे विकास कार्यात निधीची कमी भासणार नाही. अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी परमानंद कटरे, डॉ.कारेमोरे, किशन नेवारे, राधेश्याम बनकर, ललेश पटले, कृणाल कुथे, रघुनाथ मिरासे, इसराम तितीरमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन गोवर्धन शेंडे यांनी मानले.