शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

धार्मिक संस्थांच्या पुढाकारातून ‘हरितक्रांती’चे पाऊल

By admin | Updated: November 9, 2016 00:49 IST

जलयुक्त शिवार योजना : शेतकऱ्यांना मिळाला योजनेतून दिलासा

युवराज गोमासे करडी (पालोरा) शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत शासनाच्या निधी बरोबर शेगाव - शिर्डी व मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्ट आदी धार्मिक संस्थांनी सुद्धा कोट्यवधींचा निधी दिला. या निधीतून मोठी कामे झालीत. मोहाडी तालुक्यातील सनफ्लॅग आयर्न अमड स्टील कंपनीच्या बहुमुल्य योगदानामुळे सिंचनाच्या सुविधा निर्माण होवून शेतकऱ्यांसाठी ‘हरितक्रांती’ निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेत अन्य धार्मिक व सामाजिक संस्था व संघटनांनी सुद्धा निधी दिल्यास जलसंसाधनांची मोठी कामे होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या निधी बरोबर शेगाव - शिर्डी व मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्ट आदी धार्मिक संस्थांनी सुद्धा करोडोंचा निधी दिला. मोहाडी तालुक्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या बहुमुल्य योगदानामुळे सिंचनांच्या सुविधा निर्माण होवून शेतकरी सुखावण्यास मोठी मदत मिळाली. अन्य धार्मिक व सामाजिक संस्था व संघटनांनी सुद्धा शासनाच्या या कार्यात मदत केल्यास जलसंसाधनांमुळे शेतकरी वर्गाला मदत मिळेल.जलयुक्त शिवार योजनेमुळे बेभरवशाची शेती बऱ्याच प्रमाणात भरवशाची झाली. तलाव, नाल्यांचे खोलीकरणामुळे हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय मिळाली. उथळ व अतिक्रमणाने बेजार झालेल्या तलावांनी मोकळा श्वास घेतला. बांध बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे व नवनिर्माणामुळे पाण्याचा साठा निर्माण झाला. कोरड्या मातीच्या भेगांना पाण्याचा ओलावा मिळाला. तलावांचे गेट, बुजलेले कालवे, तलावांच्या पाळींची दुरुस्ती झाली. यासाठी शासनाच्या निधीबरोबर शेगाव - शिर्डी व सिद्धीविनायक ट्रस्टनी सुद्धा कोट्यवधींचा निधी दिला. त्यांच्या बहुमुल्य योगदानामुळे शेतकरी सुखावण्यास मोठी मदत मिळाली. मोहाडी तालुक्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीने पिंपळगाव येथे नाला खोलीकरणाचे काम स्वत:च्या निधीतून केले. यासाठी त्यांनी २.९७ लाखांचा निधी खर्ची घातला. करडी येथील तीन कि.मी. लांबीच्या नाला खोलीकरणासाठी २० लाखांचा निधी सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टने दिला. यामुळे मोठा फायदा शेतीला व शेतकऱ्यांना झाला.मोहाडी तालुक्यात पाटबंधारे विभाग, वनविभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती आदी विभागामार्फत सन २०१४-१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेतून कोट्यवधी रूपयांचा निधी सिंचनाच्या शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी खर्ची घातला गेला. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून नाला खोलीकरण, नाल्यांवरील बांध - बंधाऱ्यांची दुरुस्ती, तलावांचे खोलीकरण, कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती, नवीन बांध-बंधाऱ्यांची निर्मिती, कालव्याचे नुतनीकरण, तलावांच्या पाळींची दुरुस्ती आदी कामे केली गेली. याचा मोठा फायदा परिसरातील शेतीला भविष्यात होईल, शात शंका नाही. करडी परिसरात सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात धानाच्या पेरणीसाठी अपुरा पाऊस पडला तेव्हा शेतकरीवर्गाने याच संसाधनातील पाण्याचा वापर करून परे जगविले. पाणी खेचून रोवणी आटोपली. निसर्गाच्या लहरीपणावर त्यामुळे काही प्रमाणात का होईना मात करता आली. मात्र ज्या शेतकरीवर्गाने या योजनेचा लाभ घेतला नाही, अशांच्या जमिनी पडीत राहिल्याचेही वास्तव स्थिती यावर्षी दिसून आली. त्यामुळे शासनासोबत खुद्द देवानेच शेतकऱ्यांसाठी ही योजना आणल्याची अनुभूती येत आहे.मोहाडी तालुक्यात पिंपळगाव येथे सनफ्लॅग कंपनीच्या २.९७ लाखाच्या योगदानातून तसेच करडी येथे सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट मुंबईच्या फंडातून २० लाखाचे नाला खोलीकरणाचे काम झाले. अन्य संस्थांनी सुद्धा योगदान दिल्यास चांगला परिणाम दिसून येईल. शेतीला ही योजना वरदान ठरली असून यामुळे निसर्गाचे समतोल राखण्यास मदत होईल.- किशोर पाथ्रीकर, तालुका कृषी अधिकारी, मोहाडी.करडी परिसरात पाऊस कमी पडलेला असताना शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात नाल्यातील पाण्याचा उपसा करून पऱ्हे व रोवणी केली. आज त्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. नाल्यात अद्यापही पाणी असल्याने रब्बीतही पिके घेण्यास मदत होणार आहे.- निमचंद्र चांदेवार, कृषी पर्यवेक्षक, करडी.