शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूर ईको टुरिझमला हिरवा कंदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:22 IST

ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देसहा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा पुढाकार

मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. गुरूवारी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तुमसरचे तहसीलदार व संबंधित सहा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ०.५३ हेक्टर जागा पर्यटन महामंडळाला देण्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. त्यामुळे आता चांदपूर पर्यटन स्थळाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास मागील अनेक वर्षापासून रखडला आहे. तत्पूर्वी खाजगी कंत्राटदारानी अत्याधुनिक साहित्य व इतर वस्तंूचा वापर करून उल्लेखनीय कामे केली होती. परंतु त्यानंतर शासकीय उदासीनतेमुळे ती बंद पडली. वनविभागाने या पर्यटनस्थळाचा इको टुरिझमध्ये समावेश केला.सन २००२ मध्ये बीओटी तत्वावर चांदपूर पर्यटन स्थळाचा विकासाचे कंत्राट दिले होते. त्यानंतर या पर्यटनस्थळाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले होते. गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर तहसीलदार गजेंद्र बालपांडे, वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी, सिंचन, भूमी अभिलेख, वीज वितरण कंपनीचे अभियंता, बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी येथे संयुक्त भेट दिली.तलावाकडे जाणाºया जुन्या ब्रिटीशकालीन विश्रामगृह तथा इतर सदनिकासह गट क्रमांक ५ मधील ०.५३ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ही जागा देण्याचा सोपस्कर पार पडला. सर्व विभागांनी नाहरकत देण्याचे निश्चित केले. तसा अहवाल तहसिलदारांनी तयार केला. भंडारा जिल्ह्यातील एकमेव ईकोटुरिझम म्हणून या स्थळाला मंजुरी मिळाली आहे, हे विशेष.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संबंधित सहा विभागातील अधिकाऱ्यांसोबत गुरूवारी पाहणी करून सर्व सहमतीने ०.५३ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून चांदपूर पर्यटन विकासाची कामे लवकरच सुरू होतील.- गजेंद्र बालपांडे,तहसीलदार तुमसर.