शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीनफ्रेड्सने काढली ‘ग्रीन सायकल संदेश रॅली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:37 IST

येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तालुका शाखा लाखनी तर्फे लाखनी ते गडेगाव व परत लाखनी अशी १४ किमी ग्रीन सायकल संदेश रॅली वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने काढण्यात आली.

ठळक मुद्देफटाके फोडू नका: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती लाखनी तालुका शाखेचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तालुका शाखा लाखनी तर्फे लाखनी ते गडेगाव व परत लाखनी अशी १४ किमी ग्रीन सायकल संदेश रॅली वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने काढण्यात आली.ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबचे व अखील भारतीय अंनिसचे तालुका पदाधिकारी व ग्रीनफ्रेंडस सदस्य, नागरिक हिरवी टी शर्ट तसेच हिरवे संदेश बॅनर हातामध्ये घेत लाखनी पोलीस ठाण्याला सायकलीने हजर झाले. यावेळी ग्रीनफ्रेंडसचे कार्यवाह तसेच अभा अनिसचे जिल्हा उपाध्यक्ष व लाखनी तालुका अनिस संघटक प्रा. अशोक गायधने, सिध्दार्थ विद्यालय सावरीचे हरित सेना शिक्षक तसेच ग्रीनफ्रेंडस व तालुका अनिसचे पदाधिकारी दिलीप भैसारे, ग्रीनफ्रेंडसचे व तालुका अंनिसचे अध्यक्ष अशोक वैद्य, निसर्गमित्र शुभम बघेल, आदित्य शहारे, युवराज बोबडे तसेच नितीन पटले, रितीक पडोळे व रोहीत पचारे यांनी सर्व उपस्थित सिध्दार्थ विद्यालय सावरीच्या हरित सेना विद्यार्थ्यांना ग्रीन सायकल संदेश रॅलीचे महत्व, आगामी दसरा- दिवाळीच्या मोठ्या प्रमाणावर फोडले जाणारे फटाखे व होणारे प्रदुषण, वन्यप्राणी शिकार, जंगलतोड, पर्यावरणाच्या घोषणाविषयी माहिती दिली.त्यानंतर ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब तर्फे प्रत्येकाला हिरवी टी शर्ट व तसेच फटाखे फोडू नकाचे हिरवे संदेश त्याचबरोबर वन्यजीव जागृती संदेश सायकलवर देण्यात आले. संपुर्ण परिसर हिरव्या टी-शर्ट, हिरवे बॅनवर व स्टकर्स संदेश फलकमुळे हिरवामय झाला होता.ग्रीन सायकल संदेश रॅली ला हिरवी झेंडी हवालदार राकेश हेमके, गोपाल कोसरे व शिपाई राजेंद्र लांबट यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ग्रीन सायकल संदेश रॅली’ फटाके फोडू नका, वन्यप्राणी शिकार करु नका, जंगलतोड करु नका, वाघ वाचवा पर्यावरण वाचवा चा संदेश व घोषणा देत गडेगाव वनविभाग लाकुड आगार येथे पोहोचली. याठिकाणी वनपाल वाय. एन. साठवणे व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.रॅलीकरिता प्राचार्य धनंजय तिरपुडे, यश आगलावे, नितीन घनमारे, कुणाल टिचकुले, मिलिंद निर्वाण, अभय वलके, साहित्य बुराडे, दर्शन साखरवाडे, रजत चाचेरे, नितेश रंगारी, अंशू जांभुळकर, कार्तिक बुराडे, राहुल मेश्राम, अफरोज अन्सारी, सुमित गिऱ्हेपुंजे, पंकज देशमुख, आंकार चाचेरे, दुर्गेश मोहनकर, साहिल बावनकुळे आदींनी सहकार्य केले.