सिद्धार्थ गायकवाड : सामाजिक न्याय दिन उत्साहातलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शाहू महाराजांनी शोषित दलित, पिडित, महिला यांच्यासाठी अहोराष्ट कार्य केले. त्यांचे समाजोध्दाराचे कार्य महान आहे. लोकशाही प्रणालीत राजाचे विचार फार कमी स्मरण राहतात. पण आपल्या देशात शिवाजी महाराज व शाहु महाराज असे दोन राजे आहेत जे सदासर्वदा स्मरणात राहतात. त्यांचे विचार नेहमी आपणास प्रेरणा देत राहतील, असे प्रतिपादन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, सहाय्यक लेखाधिकारी एस. ए. खटी, हिवराज उके, विविध महामंडळाचे व्यवस्थापक तसेच समाज उत्थान पूरस्कारप्राप्त जिल्हयातील विजेते उपस्थित होते. गायकवाड पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक न्याय व समानता या तत्वांचा अंगिकार करणारा, लोकांशी समरस होणारा राजा म्हणून त्यांची ख्याती आहे. म्हणून त्यांच्या जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणनू आपण साजरा करतो. सर्व प्रथम राजाराम ग्रंथालय शाहू महाराजांनी सुरु केले व जनतेस ज्ञानाचे भंडार खुले केले. त्यांची प्रेरणा घेवून सामाजिक न्याय भवनात ग्रंथालय सुरु करण्यात आली. याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी व मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा. आपल्या व्यक्तीमत्वाचा व सुप्तगुणांचा विकास करावा, असेही ते म्हणाले. उच्चपदस्थांच्या बरोबरीने दलित, शोषित इतर मागासवर्गीय समाज उभा रहावा यासाठी सर्वप्रथम आरक्षण शाहू महाराजांनी आपल्या करविर संस्थानात २८ जुलै १९०२ रोजी लागू केले. विशिष्ट पदावर जाण्यासाठी आरक्षण, जे हजारोवर्ष शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी आरक्षण, मानवी अधिकारापासून वंचितांसाठी, सामाजिक विकासासाठी आरक्षण अशी शाहू महाराजांची संकल्पना होती. या महापुरुषांचा त्याग समजून त्यांच्या विचाराचे पालन करा तरच ख?्या अथार्ने सामाजिक न्याय दिवस साजरा करण्याचे सार्थक होईल, असेही ते म्हणाले. हिवराज उके म्हणाले की, शिवाजी महाराज व शाहू महाराजांनी आपल्या रय्यतेस आपल्या मुलांप्रमाणे वागविले म्हणून ते सदैव स्मरणात राहतात. आचार व विचार यांचा संयोग साधल्याशिवाय सामाजिक प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी कृतीही महत्वाची असते. शाहू महाराजांनी शोषण दारिद्र अन्याय, अत्याचार, अंधश्रध्दा, उच्च-निच, धर्मांधांचे वर्चस्व असतांनाही त्याकाळी त्यांचा सामना केले. त्यांचे विचार अंमलात आणले पाहिजे तर खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्तापित होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. यावेळी खटी, दिलीप चित्रीव, भंगाळे यांनी मार्गदर्शन केले. समाज उत्थान पूरस्कारप्राप्त जिल्हयातील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद गणविर यांनी केले तर आभार पराग वासनिकर यांनी मानले. सामाजिक न्याय दिनानिमित्त भंडारा शहरातील शाळा, महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचा समावेशासह मुख्य मार्गावरुन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झाला. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते.
शाहू महाराजांचे समाजोद्धाराचे कार्य महान
By admin | Updated: June 27, 2017 00:36 IST