उपक्रम : श्रद्धा पाटील व्यास यांचे प्रतिपादनभंडारा : माणूस निर्मिती, चारित्र्य निर्माण यातून राष्ट्रनिर्मिती, असा शिक्षणासंबंधित विचार स्वामी, विवेकानंदांनी आपणास दिला. यासोबतच अन्याय अत्याचाराचे जोखंड धुडकावत उन्नत झालेली स्त्री आपल्या कर्तृत्वाने शिक्षण क्षेत्रात मोठी भूमिका बजावू शकते, असे विचार स्वामी विवेकानंद चारित्रातील अनेक उदाहरणे देत, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीशी निगडित सेवाव्रती, श्रद्धा पाटील व्यास यांनी व्यक्त केले.त्या स्थानिक महिला डी.एड. कॉलेजमधील शिक्षण प्रशिक्षणार्थी मुलींशी संवाद साधत बोलत होत्या. मातृहृदयी शिक्षक शिक्षिकाच उत्तम संस्थेवर व ज्ञान देऊ शकतात. त्यांचे प्रेम विद्यार्थ्यांना झिरपते जे, शिकविले ते विसरले जात नाही. नरेंद्र गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याशी संवाद साधताना चिकित्सक होऊन त्यांना तपासत. ही चिकित्सावृत्ती विद्यार्थ्यात रूजविली जावी हे सांगताना श्रद्धा पाटील व्यास यांनी इतिहासातील अनेक उदाहरणे दिली. त्या नारी, शिक्षण व स्वामी विवेकानंद या विषयावर बोलत होत्या. याप्रसंगी उपस्थित शारदा मेठ कामठीच्या अमोघ प्रेरणा, माताजी म्हणाल्या, समाजनिर्मितीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. तन्मय होऊन प्रामाणिकपणे शिकवा. चिरकाल लक्षात राहील. विद्यार्थी घडतील. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य विजया पाटील म्हणाल्या, केवळ ध्यान समाधीतील स्वामी विवेकानंदांपेक्षा प्रखर समाजनिष्ठ स्वामी विवेकानंद विद्यार्थी वर्गासमोर येणे गरजेचे आहे. तसे विचार वक्त्यांनी व्यक्त केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थिनींनी संचालन व आभार मानले. वक्त्यांचा परिचय, चांदेकर यांनी करून दिला. याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खोकले, सभासद रामदास शहारे, डॉ. विजय आयनवार, दामोदर चौधरी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
मातृहृदयी शिक्षक-शिक्षिकांची राष्ट्राला नितांत गरज
By admin | Updated: August 29, 2015 00:52 IST