शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

खोट्या स्वाक्षरीने अनुदानाचा लाभ

By admin | Updated: July 13, 2016 00:43 IST

लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी (येडगाव) येथील सुधाकर कुंडलीक मेश्राम याने गावातीलच अनमोल तिरपुडे यांची खोटी ...

सालेबर्डी येथील प्रकार : साकोली पंचायत समितीअंतर्गत घटना, कारवाईची मागणी दिघोरी (मोठी) : लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी (येडगाव) येथील सुधाकर कुंडलीक मेश्राम याने गावातीलच अनमोल तिरपुडे यांची खोटी स्वाक्षरी करून विशेष घटक योजनेअंतर्गत लाभ घेतला. याबाबतचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोषीवंर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शाखा प्रमुख अविनाश तिरपुडे व अनमोल तिरपुडे यांनी केली आहे. सालेबर्डी येडगाव येथील गट क्रमांक १०३, वर्ग २, ०.७५ आराजी हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतजमिनीचे दोन समान हिस्से झालेले आहेत. यामध्ये एका हिस्स्यात रत्नघोष पुंडलीक मेश्राम, सुधाकर पुंडलीक मेश्राम, प्रेमलता प्रकाश बोंबार्डे ही नावे आहेत तर दुसऱ्या हिस्स्यामध्ये अनमोल अशोक तिरपुडे यांची नावे आहेत. गाव नमुना सातवर या चारही व्यक्तीचे नावे असून या चारपैकी कुणालाही गाव नमुना सात काढायचे असल्यास चौघांची नावे त्यात नमुद असतात. त्यामुळे शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी जर गाव नमुना सात विविध योजनांसाठी लागत असल्यास त्यात नमूद असलेल्या सर्वांची संमत्तीपत्रावर स्वाक्षरी घेणे बंधनकारक असते. मात्र सुधाकर मेश्राम यांनी पंचायत समिती साकोली अंतर्गत विशेष घटक योजनेच्या बैलबंडी व बैलजोडीच्या अनुदानाद्वारे लाभ घेतला. परंतु, गावनमुना सात मधील समान हिस्सेवारी असलेल्या अनमोल अशोक तिरपुडे यांना विश्वासात न घेता सुधाकर मेश्राम यांनी खोटी स्वाक्षरी कसे खोट्या व्यक्तीच्या नावावर सेतू केंद्रात हलफनामा तयार केला. त्यामुळे शासनाची व अनमोल तिरपुडे यांची फसवणूक करून अनुदान लाटले. याची पंचायत समिती व पोलीस ठाणे मार्फत चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व चुकीच्या मार्गाने मिळविलेले अनुदान परत करण्यात यावे, अशी मागणी साकोली तालुका शिवसेना शाखा प्रमुख अविनाश तिरपुडे व अनमोल तिरपुडे यांनी केले. (वार्ताहर)