शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियंका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

वाहनांच्या प्लेटवरून 'दादा, भाऊ' निघेनात

By admin | Updated: February 4, 2016 00:46 IST

गाड्यांच्या नंबर प्लेटवर 'दादा', 'बाबा', 'भाई' यांसारखी अक्षरे दिसणारे आकडे लावणाऱ्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांवर कडक कारवाई ...

परिवहन विभागाचे दुर्लक्ष : न्यायालयाच्या आदेशाची पायमल्लीभंडारा : गाड्यांच्या नंबर प्लेटवर 'दादा', 'बाबा', 'भाई' यांसारखी अक्षरे दिसणारे आकडे लावणाऱ्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना नोटीस बजावली आहे; मात्र नोटीस बजावल्यानंतर आरटीओ, पोलिसांकडून गेल्या वर्षभराच्या कालावधीत कोणतीच उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे नंबर प्लेटवरील दादा, भाऊ, मोदी, पाटील 'जैसे थे' असल्याचे चित्र आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार, फॅन्सी नंबर प्लेट लावणे गुन्हा ठरतो; परंतु शहरातील बहुतांश चारचाकी वाहनांवर दादा, बाबा, भाऊ, नमो, करण, पवन, पाटील, मराठा, आणि इतरही नावसदृश नंबर प्लेट आढळून येतात. इतकेच काय तर पोलीस ठाणे आणि जिल्हा न्यायालय परिसरातही अशाप्रकारच्या नंबर प्लेट असणाऱ्या गाड्या पार्क केलेल्या आढळतात. दरम्यान, केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली. त्यानुसार नंबर प्लेट या इंग्रजी अरोबिक फॉन्टमध्येच असाव्यात, असे अधिसूचित केले आहे. त्याशिवाय हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी व इतरही भारतीय भाषांमधील नंबर प्लेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही भारतीय भाषांमधील नंबर प्लेटचा सर्रास वापर होत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीला देशभरातील विविध राज्यांनी अंमलात आणले आहे; परंतु महाराष्ट्र सरकारने अद्याप दुरुस्ती लागू केलेली नाही. केंद्रीय कायद्यातील तरतुदींचे पालन व्हावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राज्य सरकारांना सुधारित नियम लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत, मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्देशाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कारवाई होत नसल्यामुळे शहरात फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्यांमध्ये स्पर्धाच लागली असल्याचे चित्र आहे. वाहनांवरील नंबर प्लेटवर काही तरी अक्षर तयार करून आपण इतरापेक्षा नक्कीच वेगळे आहोत, असा प्रयत्न होत असल्याचा शहरात दृष्टीस पडत असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवरून दिसून येत आहे. विविध राजकीय पुढाऱ्यांसह तरुण आणि सुशिक्षित नागरिकही आपल्या वाहनांवर आकर्षक नंबर प्लेट लावत असल्याचे सर्वत्र दृष्टीस पडते. न्यायालय आवार आणि पोलीस ठाण्यातही आकर्षक नंबर प्लेटची वाहने उभी केली जातात, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे.