शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभा ठरल्या कुचकामी

By admin | Updated: March 19, 2015 00:39 IST

कोणत्याही गावातील ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व असते. या ग्रामसभेला संबंधित गावातील प्रत्येक कर्मचाऱ्याने उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

तुमसर : कोणत्याही गावातील ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व असते. या ग्रामसभेला संबंधित गावातील प्रत्येक कर्मचाऱ्याने उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र ग्रामस्थ उदासीन असल्याने ग्रामसेवक वगळता ग्रामस्थांसह इतर सर्वच कर्मचारी ग्रामसभेकडे पाठ फिरवीतात. परिणामी या ग्रामसभा आता कुचकामी ठरत आहे.प्रत्येक ग्रामपंचायतीने वर्षातून किमान सहा ग्रामसभा घेणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसभांचे आयोजनही केले जाते. या ग्रामसभेत नियोजन व सनियंत्रण केले जाते. त्यात अनेक विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करावयाची असते. मात्र, ग्रामस्थच त्याबाबत प्रचंड उदासीन आहेत. परिणामी ग्रामसभेला ग्रामसेवकासह ग्रामपंचायतीचे निवडक पदाधिकारी तेवढे उपस्थित दिसतात. अत्यंत कमी प्रमाणात ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित राहतात. या ग्रामसभेला गावातील विविध समितीचे सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक-सेविका, कृषी सहाय्यक, वन कर्मचारी, पशू सहाय्यक, पोलिस पाटील, वीज कर्मचारी, तलाठी आदी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र ते उपस्थितच राहत नाही असे चित्र अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे ही ग्रामसभाच वांझोटी ठरत आहे. निवडक ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या तालावर ग्रामसभा नाचत आहे. ग्रामसभेकडे जवळपास सर्वच कर्मचारी बहुतांश ग्रामस्थ पाठ फिरवीत असल्याने त्या गावाचा विकास खोळंबतो. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षातच येत नाही. या ग्रामसभेत गावातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून आपापल्या कामाचा आढावा, तसेच शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे आवश्यक नव्हे तर बंधनकारक आहे. तरीही कर्मचारी पाठ फिरवितात. त्याबाबत कुणी तक्रारही करीत नाही. त्यामुळे कर्मचारी शिरजोर झाले आहे. संबंधित गावातील कर्मचारी जर ग्रामसभेला कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित असतील, तर त्यांच्याविरुध्द गटविकास अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहे. त्यांची वेतनवाढ रोखण्याचेही निर्देश शासनाने दिले आहे. तथापि राज्य शासनाच्या या आदेशांची कोणत्याही गावात अंमलबजावणी होताना दिसत नाही. ग्रामस्थच उदासीन असल्यामुळे कर्मचारी सोकावले आहे. ग्रामस्थांना मिळत नाही. ग्रामस्थाना विविध योजनांचीही निट माहिती मिळत नाही. ग्रामस्थच मिळत नाही. ग्रामस्थांना विविध योजनांचीही निट माहिती मिळत नाही. ग्रामस्थच ग्रामसभेला चाट मारित असल्याने कर्मचाऱ्यांचे फावत आहे. सोबतच मुठभर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्ताधारी आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेऊन मोकळे होत आहेत. नंतर मात्र हेच ग्रामस्थ ओरड करतात. त्यामुळे वेळ निघून गेलेली असते. या प्रवृत्तीत सुधारणा झाल्यास गावाच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आमचं गाव आमचं सरकार ही संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)