शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत शिवनी, बेलाचा मुंबईत गौरव

By admin | Updated: June 2, 2017 00:26 IST

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन २०१६-१७ मध्ये स्वच्छतेबाबद उल्लेखनिय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत शिवनी

सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान : महानायक अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन २०१६-१७ मध्ये स्वच्छतेबाबद उल्लेखनिय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत शिवनी व बेला यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. महानायक अमिताभ बच्चन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमालाच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, प्रधान सचिव राजेशकुमार, जलस्वराजचे राघवन, वासो चे संचालक सतीश उमरीकर, आईसी सल्लागार कुमार खेळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन २०१६-१७ यावर्षात भंडारा जिल्ह्यातील लाखनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिवनी व भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बेला ग्रामपंचायतीने उल्लेखनिय कार्य करुन गावाला स्वच्छ, सुंदर व आदर्श बनविण्यासाठी लोक सहभागातून पुढाकार घेतला. दोन्ही ग्रामपंचायती स्वच्छतेसाठी प्रेरणादायी ठरले आहे. शिवनी व बेला या दोन्ही ग्रामपंचायतीत जिल्हास्तरावर सन्मानित झाल्या आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींना केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे गौरविण्यात आला. या कार्यक्रमाला भंडारा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), सुधाकर आडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिवनी ग्रामपंचायतीचा पुरस्कार सरपंच माया कुथे, सचिव जयंत गडपायले, मोहन कुथे यांनी स्विकारला. तर बेला ग्रामपंचायतीचा पुरस्कार सरपंच शारदा गायधने, सचिव कृष्णकुमार नागपूरे, उपसरपंच अर्चना कांबळे यांनी स्विकारला. जिल्ह्यात अव्वल ठरुन राज्यात आपली छाप सोडणाऱ्या या ग्रामपंचायतींना राज्यात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा माझा महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्रचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. ग्रामपंचायत शिवनी व बेला ने केलेल्या कार्याची दखल केंद्र व राज्य सरकारने घेतल्याने जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे.