शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 00:22 IST

तालुक्यातील मुरमाडी (तुपकर) येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील चाफले यांच्यावर वैमनस्यातून प्राणघातक हल्ला केला.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील मुरमाडी (तुपकर) येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील चाफले यांच्यावर वैमनस्यातून प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे.मुरमाडी, रामपुरी ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार असलेले ग्रामसेवक दत्ता पोहरकर यांनी केलेल्या अफरातफर प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य सुनील चाफले यांनी विभागीय आयुक्त व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. विभागीय चौकशीअंती त्यांना निलंबित करण्यात आले होते. याचा वचपा काढण्यासाठी सोमवारला दुपारी ४.३० च्या सुमारास दत्ता पोहरकर यांनी सुनील चाफले यांना लाकडी दांड्याने डोक्यावर जोरदार मारहाण केली. यात सुनील चाफले गंभीररित्या जखमी झाले. त्यांना भंडारा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत दत्ता पोहरकर यांना अटक करण्यात झाली नव्हती. याप्रकरणाचा विविध संघटनांनी निषेध नोंदविला असून आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे.