शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

ग्रामपंचायत निवडणूक : २२१ सदस्य निर्विरोध; प्रचाराला उरले दोनच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 16:42 IST

ओल्या पार्ट्यांना उधाण, रात्रीला पडतोय पैशांचा पाऊस

भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीत गल्लोगल्लीचे राजकारण ढवळून काढणारा माहोल सध्या बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील ३०५ ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. प्रचाराला केवळ दोन दिवस उरल्याने उमेदवार गल्लोगल्ली पिंजून काढत आहे. निवडणुकीचा जोर शिगेला पोहोचला असून ‘ जिंकून मीच येणार ’ असा सज्जड आत्मविश्वास ही उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

गावचा सरपंच होणे म्हणजे मुख्यमंत्र्यांची पद प्राप्ती सारखेच स्वप्न उमेदवाराचे असते. अनेक ग्रामपंचायतीमध्ये निर्विरोध सरपंच तर कुठे अविरोध सदस्य म्हणून निवडून आले आहेत. मोहाडी तालुका वगळता सहाही तालुक्यांमध्ये निवडणुकांचा माहोल शिगेला पोहचला आहे. सायंकाळ सहा नंतर प्रचार थांबत असला तरी त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होत असते. हॉटेल आणि ढाबे ओल्या पार्ट्यांमुळे हाऊसफुल्ल झाले आहेत. विशेषतः ग्रामीण भागात दारू विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकेका मतासाठी एकेका कुटुंबाला किती रक्कम मोजायची याचीही जुळवाजुळव होऊ लागली आहे. किंबहुना काही क्षेत्रात तर पैसेही वाटून झाल्याची चर्चा आहे. 

उमेदवाराने मागू नये उधारी

दिघोरी (मोठी) : ग्रामपंचायत निवड- णुकीचा ज्वर जसजसा वाढत आहे तसतशी नवनवीन बाबही समोर येत आहे. असाच एक प्रकार लाखांदुर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे समोर आला आहे. येथे चक्क एका पानटपरीचालकाने कोणत्याही राजकीय उमेदवाराने निवडणुक होईपर्यंत उधारी मागु नये, अशा आशयाचा फलक लावला आहे, राजकीय उमेदवार उधारी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा चांगला अनुभव असल्याचेही पानटपरी चालकाचे म्हणणे आहे.

दोन हजार ३३० सदस्यांसाठी निवडणूक

१८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ३०५ ग्रामपंचायतीअंतर्गत प्रत्यक्षरित्या २ हजार ३३० सदस्य निवडून देण्याकरिता मतदान केले. जाणार आहे. पूर्णतः बिनविरोध झालेल्या ग्राम-पंचायतींची संख्या ४ आहे. परंतु यात सरपंच अविरोध निवडून आलेले नाहीत. प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या सदस्यांच्या जागांसाठी तुमसर तालुक्यात ६०६, भंडारा ३३७, पवनी ३५६, लाखनी ३७५, साकोली ३०८ तर लाखांदूर तालुक्यातील ३४८ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

तहसीलदारांकडून चाचणी

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकाही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, सदस्यपद जाहीर लिलावाने भरल्याबाबतचे प्रकरण समोर आलेले नाही. त्यामुळे यांची खातरजमा संबंधित तहसीलदारांकडून करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे बिनविरोध उमेदवार निवडून येताना त्यांनी इतर उमेदवारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव तर आणला नाही ना याचीही तहसीलदारांमार्फत शहानिशा झाल्यानंतरच अविरोधची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक विभागातर्फेही याबाबतची सूचना निर्गमित करण्यात आली आहे.

या तालुक्यातील सदस्य अविरोध

अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत नामनिर्देशन अर्ज वैध राहिल्याने व त्यांच्या विरोधात उमेदवार नसल्याने बिनविरोध आलेल्या सदस्यांची संख्या जिल्ह्यात २२१ इतकी आहे. यात तालुकानिहाय आकडेवारीवर नजर घातल्यास तुमसर तालुक्यात २९, भंडारा १४, पवनी २०, लाखनी ३७, साकोली ४८ तर लाखांदूर तालुक्यातील ७३ सदस्यांचा समावेश आहे. यापूर्वी ३०५ ग्रामपंचायतीअंतर्गत २ हजार ५५३ सदस्यांची निवडणूक होणार होती. मात्र आता २२१ सदस्य अविरोध निवडून आल्याने २ हजार ३३० जागांकरिता सदस्य निवडून द्यायचे आहेत.

भाऊ, अक्का व्होट मला पक्का

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी मोठी प्रतिष्ठेची मानली जाते. निवडून येणे म्हणजे जनसामान्यांत आपली प्रतिमा उंचावण्यासारखे असते. त्यामुळेच की काय, उमेदवार आपली प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार करीत आहेत. दिवसभर भोंग्यांचा आवाज आटोपल्यानंतर सायंकाळी घरोघरी भेट देण्याचे व कार्यकर्त्यांना नेऊन पार्टी देण्याचीही काम सुरू आहे. आई, अक्का, ताई, काका काहीही करा पण व्होट मलेच द्या, अशी विनवणी करीत आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायतbhandara-acभंडारा