शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीआर निघाला मात्र बोनस मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:06 IST

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रूपये बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

ठळक मुद्देशेतकरी प्रतीक्षेत : मार्केटिंग फेडरेशन कार्यालयात पायपीट सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रूपये बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या घोषणेच्या तब्बल तीन महिन्यानंतर राज्य शासनाने त्यासंबंधीचा जीआर काढला. मात्र बोनस वाटपाचे आदेश आणि निधी अद्यापही उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे जीआर निघाला मात्र त्याचे वाटप केव्हा होणार? असा प्रश्न धान उत्पादकांनी केला आहे.शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी करते. यंदा शासनाने धानाचा हमीभाव अ दर्जाच्या धानाला १,५५० रूपये जाहीर केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ४० हजारावर शेतकºयांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यावर्षी ५ लाखाहून अधिक क्विंटल धानाची खरेदी केली.मागीलवर्षी अत्यल्प पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. जवळपास ४० टक्के धानाच्या उत्पादनात घट झाल्याने खरेदीत घट झाली. धानाच्या कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चसुध्दा निघाला नाही. त्यामुळे शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रूपये बोनस देण्याची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकरी पात्र ठरले. शासनाने घोषणेनंतर तब्बल तीन महिन्यांनी जीआर काढण्यात आला. त्यात प्रती शेतकºयाला ५० क्विंटलपर्यंत बोनस देण्याची मर्यादा लावली. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही बोनस वाटप करण्यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला आदेश आलेले नाही.रबीसाठी खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार?भंडारा जिल्ह्यात रबी धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी धान निघाले असून काही शेतकरी त्या धानाची विक्री सुध्दा करीत आहे. मात्र शासनाने रबी हंगामातील धान खरेदीसाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरु केलेले नाही. त्यामुळे शेतकºयांना कमी दराने व्यापाºयांना धानाची विक्री करावी लागत आहे.