शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कुटुंबीयांसाठी शासनाची खावटी अनुदान योजना फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्यावतीने साकोली तालुक्यातील ग्राम पिटेझरी व मालूटोला गावात खावटी अनुदान वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. ...

आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्यावतीने साकोली तालुक्यातील ग्राम पिटेझरी व मालूटोला गावात खावटी अनुदान वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, बीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, तहसीलदार रमेश कुंभरे, गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेव किरसान, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष अशोक कापगते, माजी सभापती रेखा वासनिक, पिटेझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे, मालू टोलाचे सरपंच कृष्णा टेंभुर्णे, उपसरपंच दिनेश कटरे, सुनीता कापगते, अंजिरा चुटे, छाया पटले, दामोदर नेवारे, लीलाधर पटले आदी मंचावर उपस्थित होते.

प्रास्ताविकातून आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी नीरज मोरे यांनी, भंडारा जिल्ह्यातील ११७०० आदिवासी कुटुंबीयांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १०,३८४ कुटुंबीयांचे अर्ज वैध ठरले असून त्यांना मंजुरी देऊन सर्व अर्जदारांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये रोख रक्कम जमा करण्यात आल्याचे सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील पात्र आदिवासी कुटुंबीयांना खावटी किट वाटप करून उरलेल्या अर्जाच्या त्रुटी पूर्ण केल्यानंतर त्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील एकही आदिवासी कुटुंब खावटी अनुदान योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे सांगितले.

याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते उपस्थित लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले. संचालन कमलेश सारवे यांनी केले, तर आभार एस. टी. भुसारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

बॉक्स

२०१२ ची बंद झालेली खावटी योजना सुरू झाली

सन २०१२ ला बंद झालेली खावटी योजना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, यावर्षी जंगलव्याप्त व दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाजबांधवांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत रोख दोन हजार रुपये कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत, तर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्‍यक वस्तूंचे किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात येते. राज्यातील साडेबारा लाख आदिवासी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासोबतच शासनाने मोहा फुलावरील बंदी उठवली असून त्यावर आधारित उद्योगनिर्मिती करण्याची योजना राबवून जंगलव्याप्त परिसरातील महिला, युवकांना रोजगार देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकही आदिवासी कुटुंब खावटी अनुदान योजनेपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन भंडाराचे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी दिले.