शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यावर शासनाचा भर

By admin | Updated: May 29, 2017 00:20 IST

शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीकडे लक्ष न दिल्यामुळे उत्पादकता कमी झाली.

चरण वाघमारे : पांजरा येथे शेतशिवार संवाद फेरीलोकमत न्यूज नेटवर्कवरठी : शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीकडे लक्ष न दिल्यामुळे उत्पादकता कमी झाली. यावर उपाय म्हणून भाजप सरकारने सर्वप्रथम गुंतवणुकीवर भर देऊन अडीच वर्षात ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी दिले.पांजरा येथील गणेश हिंगे यांच्या शेतात आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिवार फेरीचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मोहाडी पंचायत समितीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती विलास गोबाडे, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, रवी येळणे, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबूराव ठवकर, नितीन भाजीपाले, निरंजना साठवणे, श्वेता नारनवरे, चेतन डोंगरे, बोथलीचे उपसरपंच उमेश डाकरे व वंदना बागडे उपस्थित होते.शेती विकासासासाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी खर्च केले. यात जलयुक्त शिवार, सिंचन योजना, अन्नसुरक्षा, शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ यावर खर्च करण्यात आले. अडीच वर्षात शेतकऱ्यांना ११ हजार ०९५ कोटी रुपयांची मदत दिली. ६ हजार ७३९ कोटी रुपये शासनाने पीक विम्यावर खर्च केले. शेतकरी कर्जमुक्तीने नाही तर आर्थिक सक्षम झाल्यास कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. यावर उपाययोजना करीत आहे. यासाठी शेतीला मुबलक पाणी, शेतीमालाला भाव आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आमदार वाघमारे यांनी दिली. संचालन घनश्याम बोंद्रे यांनी तर आभार रवी येळणे यांनी मानले.