शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक विक्री बंद करण्याचा शासनस्तरावर डाव

By admin | Updated: February 7, 2015 23:17 IST

बनावट मुद्राकांना आळा घालण्याच्या नावाखाली चक्क मुद्रांक विक्रीच बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. २१ जानेवारीपासून हजार रुपये व त्यावरील किमतीचे न्यायीकेतर

भंडारा : बनावट मुद्राकांना आळा घालण्याच्या नावाखाली चक्क मुद्रांक विक्रीच बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. २१ जानेवारीपासून हजार रुपये व त्यावरील किमतीचे न्यायीकेतर मुद्रांकाची छपाई, वितरण व विक्री पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भिती आहे. अपर मुद्रांक नियंत्रकांच्या २३ जानेवारीच्या पत्रानुसार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक पुणे यांच्या संदर्भीय पत्राचा हवाला देत पुढील आदेशापर्यंत राज्यातील सर्व जिल्हा कोषागारे व सर्व परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना एक हजार व त्यावरील अभिधानाच्या न्यायीकेतर मुद्रांक वितरण व विक्री तात्काळ थांबविण्याचे आदेशीत करण्यात आले आहे. ई-चलान किंवा ईएसबीटीआर पद्धतीमुळे शासनाकडून मुद्रांक विक्रेत्यांना कोणतेही कमिशन द्यावे लागणार नसले तरी जनतेला मात्र आर्थिक भुदंर्डाला सामोरे जावे लागणार आहे. १०० ते ९०० च्या वर लागणारे मुद्रांक खरेदीसाठी जनतेला ई-चलान किंवा ईएसबीटीआर करण्यासाठी १०० ते २०० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. राज्यात विक्रेत्यांना मुद्रांक विक्रीची मर्यादा ३० हजार कमी केली नसली तरी एखाद्याला ३० हजाराचे मुद्रांक द्यावयाचे असल्यास ५०० रुपयांचे ६० नग घ्यावे लागतील. नोंदणी करताना प्रती नग २० रुपये प्रमाणे एक हजार २०० रुपये फी द्यावी लागेल. त्यानंतर झेरॉक्सचा खर्चही सोसावा लागेल. राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते हे शासनमान्य असून, आगाऊ रकमेचा भरणा करून संबंधित कोषागारातून मुद्रांकाची उचल करतात. नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्यांना ते विकतात. मात्र त्यांनी कधीही बनावट मुद्रांक विकल्याचे प्रकरण घडले नाही. अशा स्थितीत शासनाने घेतलेला हा निर्णय मुद्रांक विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कायदेशीर मागार्ने रोजगार मिळविणे प्रत्येकाचा अधिकार आहे. या अधिकाराने दिलेल्या मर्यादेपर्यत कोणत्याही किमतीचा न्यायीकेतर मुद्रांक विक्री करणे व त्यातून रोजगार मिळविणे आलेच. असे असताना शासनाने मुद्रांक विक्रेत्यांना बेरोजगार करण्याचा घाट घातला आहे. त्यांना ई-प्रणालीमधून रोजगार मिळवून द्यावा, असे भंडारा येथील मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)