शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने वनजमिनीचे पट्टे मोफत द्यावे

By admin | Updated: July 11, 2016 00:28 IST

वनजमी कायदा २००६ नुसार १९७८ ते ३१ डिसेंबर २००५ पुर्वी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणधारक रहिवासी घरांना आणि शेतकऱ्यांना मोफत पट्टे वाटप करण्याची तरतुद आहे.

अन्यथा जेलभरो आंदोलन : अजयराव तुमसरे यांचा इशारासाकोली : वनजमी कायदा २००६ नुसार १९७८ ते ३१ डिसेंबर २००५ पुर्वी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणधारक रहिवासी घरांना आणि शेतकऱ्यांना मोफत पट्टे वाटप करण्याची तरतुद आहे. परंतु कायद्यातील जाचक अटिंमुळे अनेक अतिक्रमीत घरांना आणि शेतजमिनीला शासनाने पट्टे दिलेले नाही. जिल्हा हा वनव्याप्त जिल्हा असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येने प्रत्येक तालुक्यात घरांकरीता आणि शेतजमिनीकरीता पिढीजात अतिक्रमण केलेले असल्यामुळे अनेक कुटूंब शासनाच्या लाभापासून वंचित आहेत. मागील फेब्रुवारी महिन्यात साकोलीमध्ये १५०० अतिक्रमण धारक कुटूंबानी डॉ. अजयराव तुमसरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साकोली यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून २००६ च्या अतिक्रमण कायद्यानुसार मोफत पट्टा मिळावा म्हणून सामूहिक अर्ज करण्यात आला होता. जवळपास ७० टक्के साकोली म्हणजेच संपूर्ण पंचशील वॉर्ड, शिवाजी वॉर्ड, श्रीनगर कॉलोनी, निपाने कॉलोनी, नर्सरी कॉलोनीतील काही भाग हा अतिक्रमण धारक आहे. अतिक्रमण धारकांना मोफत पट्टे वाटप कायदा २००६ नुसार सर्व अतिक्रमण धारकांना नियमानुसार मोफत पट्टे देण्याची तरतुद असुनही शासनाने अतिक्रमण धारकाकडून धनाढ्य लोकांना लाखों रूपये घेवून पट्टे दिल्याचा आरोप डॉ. तुमसरे यांनी केलेला आहे. गोरगरीब लोकांना पट्ट्याची रक्कम भरणे कठीण असल्यामुळे हे सर्व कुटंूब शासकीय लाभापासून ३०-४० वर्षापासून वंचित असल्याची खंतही व्यक्त केली. एकीकडे शासनाने वनजमीन मोफत पट्टे वाटप कायदा बनविला आणि दुसरीकडे अतिक्रमण धारकांकडून लाखों रूपयांची लुट करून पट्टे वाटप करण्याचे धोरण सुरू केले आहे. ही आर्थिक लुट बंद करून शासनात मोफत पट्टे वाटप करावे अन्यथा आंदोलन करणार असल्याचे डॉ. अजयराव तुमसरे यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)