शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने ‘तो’ निर्णय रद्द करावा

By admin | Updated: July 11, 2017 00:21 IST

सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा शासनाने जो निर्णय घेतला तो अन्यायकारक आहे.

बीआरएसपीची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा शासनाने जो निर्णय घेतला तो अन्यायकारक आहे. यामुळे सामान्य माणुस हा त्या पदापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने याबाबत फेरविचार करुन सदर निर्णय तात्काळ रद्द करावा व निवडणुकीत निवडून येणाऱ्या सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याचा लोककल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेवून दिलासा द्यावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.भारतीय संविधानात तरतुद केल्याप्रमाणे सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जात आहेत. निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधुन बहुमताने सरपंचाची निवड केली जाते हीच पध्दत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री पदाची निवड करतांना अवलंबिली जाते. परंतु शासनाने सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याचा व सरपंचपदासाठी १९९५ नंतर जन्म झालेल्या व्यक्तीनांच निवडणूक लढविण्याचा आणि शैक्षणिक पात्रता सातवी असल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अधिकारावर गदा आणण्याचा कुटील डाव खेळला जात आहे. यावरुन मागासवर्गीय समाजातील नागरिक अशा पदापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे संविधान दत्त अधिकाराचे हनन आहे. निवडणूकीत साम,दाम, दंड भेद नितीचा वापर करण्यात येत असल्याने जो व्यक्ती कमी शिकलेला आहे पण, त्याच्याकडे आर्थिक पाठबळ आहे तो व्यक्ती या बळाचा वापर करुन तो पद हस्तगत करेल. आणि जो शिक्षीत आहे. त्याला या पदापासुन मुकावे लागेल. १९९५ नंतर जन्म झालेल्यांना निवडणूकीत उभे राहता येईल असे नमुद असल्याने १९९५ पूर्वीच्या नागरिकांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. या जाचक अटीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी शासनाने वेळीच दखल घेऊन व सम्यक विचार करुन सरपंच पदाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाअध्यक्ष झेड. आर. दुधकुवर, जिल्हाप्रभारी डॉ. महेंद्र गणवीर, प्रा.मधुकर ऋषेश्वरी, संजय रामटेके, संजय गजभिये, नारद गणविर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.